Ration Card E-KYC: चकरा माराव्या लागणार नाहीत, रेशन कार्डची ई-केवायसी करा ऑनलाइन; जाणून घ्या 2 मिनिटांची सोपी प्रक्रिया

महाराष्ट्रातील नागरिक आता कोणत्याही रांगेत न उभे राहता थेट मोबाईलवरूनच ही ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

Ration Card E-KYC: चकरा माराव्या लागणार नाहीत,  रेशन कार्डची ई-केवायसी करा ऑनलाइन; जाणून घ्या 2 मिनिटांची सोपी प्रक्रिया

Ration Card eKYC in Marathi: सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्र किंवा मृत व्यक्तींच्या नावावर धान्य लाटणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी सरकारने रेशन कार्डची ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य केले आहे. केवळ गरजू आणि खऱ्या पात्र लाभार्थ्यांनाच शासनाच्या सवलतीतील वा मोफत धान्याचा लाभ मिळावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ही प्रक्रिया मुदतीत पूर्ण न केल्यास रेशन कार्ड रद्द होण्याचा किंवा शिधापत्रिकेतील नाव वगळले जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

घरबसल्या मोबाईलवरून ई-केवायसी करण्यासाठी आवश्यक ॲप्स
महाराष्ट्रातील नागरिक आता कोणत्याही रांगेत न उभे राहता थेट मोबाईलवरूनच ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून खालील दोन ॲप्स डाऊनलोड करणे गरजेचे आहे:

– Mera eKYC ॲप
– Aadhaar FaceRD ॲप

मोबाईलद्वारे ई-केवायसी पूर्ण करण्याची टप्प्याटप्प्याने प्रक्रिया
ही ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत सोपे असून त्यासाठी खालील पायऱ्यांचा अवलंब करावा लागेल:

– सर्वप्रथम मोबाईलमध्ये Mera eKYC हे ॲप ओपन करा.
– ॲपमध्ये रेशन कार्डमधील मुख्य सदस्याचा आधार क्रमांक प्रविष्ट करा.
– आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी (OTP) टाकून पडताळणी पूर्ण करा.
– यानंतर ॲपमधील कॅमेऱ्याच्या साहाय्याने रेशन कार्डमधील सदस्याचा चेहरा स्कॅन करा.
– चेहरा स्कॅन होताना डोळ्यांची उघडझाप करा, जेणेकरून प्रणाली चेहरा व्यवस्थित ओळखू शकेल.
– चेहरा जुळल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा; तुमची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण होईल.

हेही वाचा – लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी! 1 सप्टेंबरपासून खात्यात दरमहा जमा होणार 2500 रुपये

वेळेत ई-केवायसी करण्याचे महत्त्व
आधार कार्डची माहिती शिधापत्रिकेशी जोडल्यामुळे सिस्टीममधील सर्व गैरप्रकार रोखण्यास मदत होत आहे. वेळेत ई-केवायसी केल्याने रेशन दुकानातून नियमित मिळणाऱ्या धान्याचा पुरवठा विनाअडथळा सुरू राहतो. त्यामुळे सर्व रेशन कार्डधारकांनी ही 2 मिनिटांची सोपी ऑनलाईन प्रक्रिया त्वरित पूर्ण करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number