Bank Merger : RBI चा मोठा निर्णय, ‘या’ चार सहकारी बँकांचे विलीनीकरण; गुंतवणूकदारांच्या ठेवींवर काय परिणाम होईल?

आरबीआयच्या अधिकृत निवेदनानुसार, या निर्णयाचा उद्देश गुजरातमधील सहकारी बँकिंग क्षेत्र अधिक स्थिर, सक्षम आणि विश्वासार्ह बनवणे हा आहे.

Bank Merger : RBI चा मोठा निर्णय, ‘या’ चार सहकारी बँकांचे विलीनीकरण; गुंतवणूकदारांच्या ठेवींवर काय परिणाम होईल?

Bank Merger: भारतीय रिझर्व्ह बँकेने गुजरातमधील चार सहकारी बँकांच्या विलीनीकरणाला अंतिम मंजुरी दिली असून हा निर्णय 15 डिसेंबर 2025 पासून अंमलात आला आहे. या प्रक्रियेमुळे चार स्वतंत्र बँका आता दोन मजबूत सहकारी बँकांमध्ये रूपांतरित झाल्या आहेत. बँकिंग नियमन कायदा, 1949 अंतर्गत करण्यात आलेले हे विलीनीकरण संबंधित बँकांच्या परस्पर संमतीने स्वेच्छेने करण्यात आल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. आरबीआयच्या अधिकृत निवेदनानुसार, या निर्णयाचा उद्देश गुजरातमधील सहकारी बँकिंग क्षेत्र अधिक स्थिर, सक्षम आणि विश्वासार्ह बनवणे हा आहे. विलीनीकरणानंतर बँकांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन ग्राहकांना अधिक सुदृढ सेवा मिळतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा – Gold Rate Today: आज सोनं-चांदीच्या भावाने गाठला नवा उच्चांक; आजचे दर काय?

दोन स्वतंत्र योजनांतर्गत विलीनीकरण

पहिल्या विलीनीकरण योजनेनुसार, द आमोद नागरिक सहकारी बँक, अहमदाबाद ही द भुज मर्कंटाइल सहकारी बँकेत विलीन करण्यात आली आहे. आजपासून आमोद बँकेच्या सर्व शाखा भुज मर्कंटाइल बँकेच्या शाखा म्हणून कार्यरत राहतील. हे विलीनीकरण बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 44अ अंतर्गत पूर्ण करण्यात आले आहे. तथापी, दुसऱ्या योजनेत, अमरनाथ सहकारी बँक ही कालूपूर कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेत विलीन झाली आहे. विलीनीकरणानंतर अमरनाथ बँकेच्या सर्व शाखा आता कालूपूर बँकेच्या अंतर्गत सेवा देणार आहेत.

हेही वाचा – Dollar Vs Rupee: रुपया घसरतच चालला; डॉलरसमोर नवा नीचांक, अर्थ बाजारात चिंता

ग्राहकांच्या ठेवींबाबत दिलासा

विलीनीकरणानंतर ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित आहेत का, हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, यासंदर्भात आरबीआयने स्पष्ट भूमिका मांडत सांगितले आहे की, या निर्णयाचा ग्राहकांच्या ठेवींवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही. सर्व खातेदारांसाठी बँकिंग सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील आणि त्यांच्या ठेवी पूर्णतः सुरक्षित राहतील. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number