Rohini Paradhye Death Case: ‘चिमणे, परत ये गं…’ रोहिणीच्या पतीची भावनिक पोस्ट; मात्र सोशल मीडियावर वेगळंच चित्र, नेटकऱ्यांना नेमकं काय खटकलं?

रील स्टार रोहिणी पाराध्येच्या निधनानंतर पती निलेश पाराध्ये यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली.

Rohini Paradhye Death Case: ‘चिमणे, परत ये गं…’ रोहिणीच्या पतीची भावनिक पोस्ट; मात्र सोशल मीडियावर वेगळंच चित्र, नेटकऱ्यांना नेमकं काय खटकलं?

रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणानंतर तिचे पती निलेश पाराध्ये यांनी सोशल मीडियावर पहिल्यांदाच भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर नव्या चर्चांना तोंड फुटले असून अनेकांनी संताप व्यक्त करत विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील प्रसिद्ध रील स्टार आणि ‘हॉटेल ग्रामपंचायत’ची मालकीण म्हणून ओळख असलेल्या रोहिणीच्या निधनाने परिसरासह सोशल मीडिया विश्वही हादरलं आहे.

26 मे रोजी रोहिणीने हॉटेलच्या किचनमध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. या घटनेनंतर तिच्या चाहत्यांमध्ये आणि नेटिझन्समध्ये हळहळ व्यक्त होत असतानाच अनेकांनी तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा सुरू केली. विशेष म्हणजे, घटना घडली त्यावेळी पती निलेश हॉटेलच्या बाहेर असल्याचं सांगितलं जात असल्याने सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

हेही वाचा: Mumbai News : मोठी बातमी! मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने परिसरात खळबळ; पोलिसांसह बॉम्ब शोध पथकाची घटनास्थळी धाव

घटनेनंतर काही दिवसांनी निलेश यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. “माझी बायको, माझी चिमणी मला सोडून जायचं नव्हतं गं…” अशा शब्दांत त्यांनी पत्नीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. गेल्या पाच वर्षांत रोहिणीने प्रत्येक संकटात साथ दिली, आयुष्य उभं करण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले, असा उल्लेख त्यांनी पोस्टमध्ये केला आहे. तिच्याशिवाय आयुष्य रिकामं झालं असल्याचंही त्यांनी म्हटलं.

मात्र या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटू लागल्या. काहींनी निलेश यांच्या भावनांबद्दल सहानुभूती व्यक्त केली, तर अनेकांनी रोहिणीच्या आयुष्यातील तणाव आणि तिच्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांबद्दल प्रश्न उपस्थित केले. “ती पत्नी होती की फक्त काम करणारी व्यक्ती?” अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया अनेकांनी कमेंटमध्ये दिल्या. काहींनी तर घटना घडली तेव्हा नेमकं काय घडलं, याबाबत सखोल चौकशीची मागणीही केली आहे.

हेही वाचा: Insurance Scams: विमा कंपन्यांच्या नावाखाली मोठा सायबर फ्रॉड; चुकूनही शेअर करू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा…

रोहिणी पाराध्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होती. तिच्या व्हिडिओंना हजारो व्ह्यूज मिळायचे. ‘हॉटेल ग्रामपंचायत’ या नावामुळेही ती चर्चेत आली होती. तिच्या अचानक जाण्याने अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर तिचे जुने व्हिडिओ आणि फोटो शेअर करत चाहते श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून आत्महत्येमागचं नेमकं कारण काय, याचा शोध घेतला जात आहे. कौटुंबिक तणाव, मानसिक दबाव किंवा इतर कोणते कारण यामागे होते का, याची माहिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेमुळे सोशल मीडियावर दिसणाऱ्या आयुष्याच्या मागे दडलेला मानसिक ताण पुन्हा एकदा समोर आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number