Gold Biscuits: आजच्या काळात सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असताना, एका लग्नातील शाही थाटाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य माणूस दागिना घडवताना दहावेळा विचार करतो, मात्र सौदीतील एका लग्नात चक्क सोन्याची बिस्किटे पाहुण्यांना भेट म्हणून (Gift) देण्यात आली आहेत. नवरीच्या भावाच्या या औदार्याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
नेमकं काय आहे व्हिडिओमध्ये?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) वर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये लग्नाचा भव्य सोहळा दिसत आहे. यामध्ये नवरीचा भाऊ पाहुण्यांचे स्वागत करताना त्यांना मिठाईऐवजी 100 ग्रॅम वजनाची शुद्ध सोन्याची बिस्किटे वाटताना दिसत आहे. विशेष म्हणजे, काही पाहुणे एवढी महागडी भेट घेताना संकोच करत असून ते चक्क नकार देतानाही व्हिडिओमध्ये कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
नेटकऱ्यांमध्ये ‘बिस्किटांची’ चर्चा
सध्या सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांच्या घरात पोहोचला आहे. अशा महागाईच्या काळात सोन्याची उधळण पाहून युजर्सनी गमतीशीर कमेंट्स केल्या आहेत. “हे आधी माहित असतं, तर बिन बुलाये मेहमान म्हणून गेलो असतो!” अशी मिश्किल टिप्पणी एका युजरने केली. “पुढच्या वेळी अशा श्रीमंत कुटुंबाच्या लग्नाची माहिती आधीच द्या,” अशी विनंतीही काही नेटकऱ्यांनी केली आहे.
Saudi wedding ceremony Bride’s brother offers 24 karat Gold biscuits to Groom’s family ?
pic.twitter.com/2lOAZwUhoi — Frontalforce ?? (@FrontalForce) February 11, 2026
कुठला आहे हा व्हिडिओ?
हा व्हिडिओ सौदी अरेबियातील एका अतिश्रीमंत कुटुंबातील असल्याचा दावा केला जात आहे. @FrontalForce नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून, त्याला आतापर्यंत 74 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एआय टूल Grok ने देखील या घटनेच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, हे लग्न नेमके कोणत्या तारखेला आणि कोणत्या शहरात झाले, याची अधिकृत माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे.