Share Market Today : शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; ‘हिटवेव्ह’मुळे अदानी पॉवरची रॉकेट भरारी, इन्फोसिसला टाकले मागे

आज बाजार उघडताच 2.30 लाख कोटी रुपयांनी वाढून थेट 472 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी भर पडली आहे.

Share Market Today : शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; ‘हिटवेव्ह’मुळे अदानी पॉवरची रॉकेट भरारी, इन्फोसिसला टाकले मागे

Share Market Today : भारतीय शेअर बाजारात गेल्या दोन सत्रांपासून सुरू असलेल्या घसरणीच्या सत्राला अखेर ब्रेक लागला असून मे महिन्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे आज बाजार उघडताच सेन्सेक्स 352 अंकांनी उसळून 76220.02 वर पोहोचला, तर निफ्टीनेही 95 अंकांची झेप घेत 24002.80 चा स्तर गाठला. गुरुवार, 28 मे रोजी बकरी ईदनिमित्त बाजार बंद होता. बुधवारी लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल (मार्केट कॅप) 470 लाख कोटी रुपये होते, जे आज बाजार उघडताच 2.30 लाख कोटी रुपयांनी वाढून थेट 472 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी भर पडली आहे.

अमेरिका-इराण युद्धबंदीचे संकेत आणि आशियाई बाजारात तेजी
जागतिक स्तरावर अमेरिका आणि इराण यांच्यात आणखी 60 दिवसांसाठी युद्धबंदी (शस्त्रसंधी) होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या करारावर केवळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी होणे बाकी आहे. हा समझोता यशस्वी झाल्यास होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) आंतरराष्ट्रीय जहाजांची वाहतूक पूर्ण क्षमतेने पूर्ववत सुरू होईल. यामुळे जागतिक ऊर्जा संकट कमी होऊन कच्च्या तेलाच्या किमतींमधील वाढ थांबण्यास मोठी मदत होणार आहे. याच सकारात्मक बातमीमुळे भारताव्यतिरिक्त इतर आशियाई बाजारातही मोठी तेजी आहे; ज्यामध्ये जपानचा निक्केई 225 तब्बल 2.4 टक्के, तैवान वेटेड 2.6 टक्के, दक्षिण कोरियाचा कोस्पी 2.8 टक्के तर हेंगसेंग आणि जकार्ता कंपोझिट प्रत्येकी 1 टक्क्याने वधारले आहेत.

देशातील तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे अदानी पॉवरचा नवा विक्रम
विजेच्या मागणीत प्रचंड वाढ: या जागतिक आणि देशांतर्गत तेजीच्या वातावरणात अदानी समूहाची कंपनी 'अदानी पॉवर' (Adani Power) च्या शेअर्सनी बाजारात धुमाकूळ घातला आहे. या वर्षी असलेल्या 'एल निनो'च्या प्रभावामुळे संपूर्ण देशभरात सध्या भीषण उष्णतेच्या लाटा (Heatwave) जाणवत आहेत.

जगातील सर्वात उष्ण शहरे भारतात: 22 मे 2026 पर्यंतच्या हवामान आकडेवारीनुसार, जगातील 100 सर्वात उष्ण शहरांच्या यादीत एकट्या भारतातील तब्बल 97 शहरांचा समावेश होता, तर उर्वरित 3 शहरे नेपाळमध्ये होती. या अभूतपूर्व उष्णतेमुळे देशात विजेचा वापर आणि मागणी कमालीची वाढली असून, याचा थेट बंपर फायदा अदानी पॉवरसह वीज क्षेत्राशी संबंधित शेअर्सना मिळाला आहे.

हेही वाचा – Plastic Currency Notes : कागदी चलनाचा जमाना संपणार? भारतात लवकरच येणार 'प्लास्टिक'च्या नोटा; काय आहे RBI चा नेमका प्लॅन?

इन्फोसिसला मागे टाकत अदानी पॉवर देशातील 11 वी मोठी कंपनी
या प्रचंड मागणीच्या जोरावर अदानी पॉवरने आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसला (Infosys) बाजार मूल्याच्या शर्यतीत मागे टाकून कॉर्पोरेट जगतात मोठी झेप घेतली आहे. सध्या अदानी पॉवरचे एकूण मार्केट कॅपिटल सुमारे 4.85 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे इन्फोसिसच्या 4.72 लाख कोटी रुपयांपेक्षा 0.13 लाख कोटी रुपयांनी जास्त आहे. या ऐतिहासिक कामगिरीसह अदानी पॉवर आता भारतीय शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत थेट 11 व्या स्थानावर पोहोचली आहे. चालू वर्ष 2026 मध्येच कंपनीच्या मूल्यामध्ये तब्बल 68 टक्क्यांची अफाट वाढ नोंदवली गेली आहे.

5 वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल 12 पट परतावा
गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या या शेअरने गेल्या एका आठवड्यात 13 टक्के आणि वर्षभरात 126 टक्के परतावा दिला आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा (लॉन्ग टर्म) विचार केल्यास, मागील 3 वर्षांत या शेअरमध्ये 384 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर गेल्या 5 वर्षांत या स्टॉकने तब्बल 1,213 टक्के म्हणजेच गुंतवणूकदारांना जवळजवळ 12 पट बंपर रिटर्न दिला आहे. आज म्हणजेच 29 मे 2026 रोजी हा शेअर बाजारामध्ये 246.07 रुपयांच्या पातळीवर व्यापार करत असून रिटेल गुंतवणूकदार आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये या शेअरची खरेदी करण्यासाठी मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Gold Silver Price Today: लग्नसराईत ग्राहकांना दिलासा! अमेरिका-इराण वादामुळे सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number