Gold-Silver Rate : सराफ बाजारात मोठी उलथापालथ! सोन्याच्या भावात विक्रमी तेजी, चांदीनेही दिला मोठा झटका; जाणून घ्या नवे दर

जळगावच्या बाजारात सोने-चांदीच्या दरात पुन्हा मोठी भाव वाढ झाली असून आठ दिवसात सोन्याचे भाव हे बारा हजार रुपयांनी तर चांदीचे भाव जवळपास सहा हजार रुपयांनी वाढलेले आहेत.

Gold-Silver Rate : सराफ बाजारात मोठी उलथापालथ! सोन्याच्या भावात विक्रमी तेजी, चांदीनेही दिला मोठा झटका; जाणून घ्या नवे दर

जळगावच्या बाजारात सोने-चांदीच्या दरात पुन्हा मोठी भाव वाढ झाली असून आठ दिवसात सोन्याचे भाव हे बारा हजार रुपयांनी तर चांदीचे भाव जवळपास सहा हजार रुपयांनी वाढलेले आहेत. या भाववाढी मागची प्रमुख कारणे अशी आहेत की, जगात वाढलेली आर्थिक आणि भू राजकीय अस्थिरता. युद्धजन्य परिस्थिती भारताच्या तुलनेत बघता डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण. मध्यवर्ती बँक सोने खरेदी करत आहे. फेडरल रिझर्व बँक व्याजदर निश्चित करणार होते मात्र विलंब होत आहे.

हेही वाचा- Rahul Gandhi’s Letter to Devendra Fadnavis : “हे विद्यार्थी दान मागत नाहीत” आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून राहुल गांधींचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अमेरिका महागाई बाबत धोरण निश्चित करणार होती मात्र ते धोरण निश्चित झाले नसून यामुळेच ही भाव वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. आगामी काळात देखील मोठी भाव वाढ होऊ शकते असा अंदाज सोन्याचा तज्ज्ञांनी व्यक्त केला असून जळगावच्या बाजारात सोन्याचे दर हे जीएसटी सह 1 लाख 65 हजार 315 रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. तर चांदीचे दर 2 लाख 55 हजार 440 रुपयांवर जाऊन पोहोचले आहे आगामी काळात देखील सोने चांदीच्या दरात मोठी वाढ होऊ शकते असा अंदाज सोने तज्ञ यांनी व्यक्त केला आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number