Gold Ring for Newborn Babies: सरकारचा मोठा निर्णय! नवजात बालकांना मिळणार 1 ग्रॅमची सोन्याची अंगठी; कोण ठरणार पात्र?

पुरवठा करण्यात येणाऱ्या प्रत्येक 1 ग्रॅम सोन्याच्या अंगठीची गुणवत्ता राखण्यासाठी गुणवत्तेचे कडक निकष निश्चित करण्यात आले आहेत.

Gold Ring for Newborn Babies: सरकारचा मोठा निर्णय! नवजात बालकांना मिळणार 1 ग्रॅमची सोन्याची अंगठी; कोण ठरणार पात्र?

Gold Ring for Newborn Babies: सरकारी रुग्णालयांवर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ व्हावा आणि तेथील प्रसूतींचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री विजय यांनी 'थैमामन गोल्ड रिंग स्कीम' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कल्याणकारी योजनेअंतर्गत राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालकाला 1 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली जाईल. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत ही योजना राबवली जात असून 15 सप्टेंबर 2026 रोजी माजी मुख्यमंत्री सी. एन. अन्नादुरई यांच्या जयंतीचे औचित्य साधून तिची औपचारिक सुरुवात होईल. मात्र, 22 जून 2026 पासून जन्माला आलेली बालके या योजनेसाठी पात्र मानली जाणार आहेत.

4.41 लाखांहून अधिक सोन्याच्या अंगठ्यांची होणार खरेदी
या उपक्रमासाठी तामिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशनने (TNMSC) 14 जुलै रोजी निविदा प्रक्रिया राबवली होती, ज्यामध्ये 11 नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. एकूण 4,41,667 सोन्याच्या अंगठ्या खरेदी करण्याचे नियोजन असून, त्यापैकी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत जन्मलेल्या 1,28,499 पात्र बालकांसाठी अंगठ्यांचा पुरवठा करण्याचे कंत्राट 'जॉय अलुक्कास' आणि 'कल्याण ज्वेलर्स' या दोन बड्या ज्वेलर्सना देण्यात आले आहे. बीआयएस (BIS) स्टॅम्पिंग, विमा, वाहतूक आणि प्रक्रिया शुल्कासह अत्यल्प दरात पुरवठा करण्याची बोली लावल्याने या दोन्ही कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा – Influencers Govt Scheme: रील्स बनवा अन् सरकारकडून लाखो रुपये कमवा! इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची भन्नाट योजना

बीआयएस हॉलमार्क अन् सुरक्षित पुरवठा साखळीची रचना
पुरवठा करण्यात येणाऱ्या प्रत्येक 1 ग्रॅम सोन्याच्या अंगठीची गुणवत्ता राखण्यासाठी गुणवत्तेचे कडक निकष निश्चित करण्यात आले आहेत. सर्व अंगठ्यांवर बीआयएस हॉलमार्क असणे अनिवार्य असून, उत्पादकांकडून ते थेट आरोग्य केंद्रांपर्यंत सुरक्षित वातावरणात पोहोचवले जातील. रुग्णालयांमध्ये सोन्याच्या अंगठ्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष लॉकर आणि चोवीस तास सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येणार आहे, जेणेकरून पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय ही भेट सुपूर्द करता येईल.

सर्वसामान्य कुटुंबांसाठी दिलासादायक उपक्रम
राज्यात वर्षाला सुमारे 4 लाखांहून अधिक बालके सरकारी वैद्यकीय संस्थांमध्ये जन्माला येतात. या योजनेमुळे केवळ बालकाच्या जन्माचा आनंद द्विगुणीत होणार नसून, गोरगरीब कुटुंबांना एक मोलाचा आर्थिक व सामाजिक आधारही मिळणार आहे. नवजात बालकांसाठी देशात पहिल्यांदाच अशा प्रकारची व्यापक आणि अनोखी योजना राबवली जात असल्याने तामिळनाडू सरकारच्या या निर्णयाचे जनतेकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत केले जात आहे.

हेही वाचा – Sugar Price Hike : साखर झाली 'कडू'! 10 लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी; केंद्र सरकारकडून मोठ्या साठ्यावर मर्यादा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number