मध्यपूर्वेतील युद्ध आणि अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. हे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, चलन विनिमय दर आणि स्थानिक करांनुसार (जीएसटी) बदलू शकतात. इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे जागतिक पातळीवर गुंतवणूकदार सावध झाले आहेत. जागतिक बाजारातील घडामोडी आणि भारतीय रुपयाच्या मूल्यातील बदलांमुळे सोने-चांदीच्या भावात चढ-उतार होत आहेत. भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
हेही वाचा- Meta Layoffs: मेटा पुन्हा करणार 16 हजार कर्मचाऱ्यांची कपात? 'हे' आहे मुख्य कारण.. मार्क झुकरबर्गने आधीच म्हटले होते..
अशातच केंद्र सरकारने 14 मार्च रोजी सोन्याच्या बेस इम्पोर्ट प्राइसमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. सरकारने सोन्याच्या बेस इम्पोर्ट प्राइस मध्ये प्रति 10 ग्रॅम 12 डॉलर्सची कपात केली. ज्यामुळे सोनेाचा बेस इम्पोर्ट प्राइस 1664 डॉलर प्रति 10 ग्रॅमवरून कमी होऊन 1652 डॉलर प्रति 10 ग्रॅम इतका करण्यात आला असून हे बदल नव्या दरानुसार करण्यात आले आहेत. सरकारहच्या या निर्णयामुळे ज्वेलर्स, व्यापारी आणि ग्राहकांना काही प्रमाणात फायदा होऊ शकतो.
बेस इम्पोर्ट प्राइस हा असा मानक दर आहे, ज्यावर सरकार परदेशातून आयात केलेल्या वस्तूंवर (उदा. सोने, चांदी, वनस्पती तेल) कस्टम ड्युटी आणि इतर कर आकारते. हा दर जागतिक बाजारातील किमतींनुसार 15 दिवसांनी बदलला जातो, ज्यामुळे आयातदारांवरील कराचा भार नियंत्रित राहण्यास मदत होते. सरकारचा हा निर्णय देशांतर्गत बाजार स्पर्धात्मक ठेवण्यास मदत करू शकतो आणि आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारातील बदलांशी चांगले समन्वय साधण्यासही उपयोगी ठरू शकतो. दरम्यान या नव्या आयात दरांचा परिणाम देशांतर्गत सोनेाच्या किमतीवरही होण्याची शक्यता आहे.