Chinese Company Employees iPhone17 Gift: सध्या सर्वत्र आयफोनची क्रेझ आहे. परंतु, हाचं आयफोन जर तुम्हाला तुमच्या कंपनीने भेट म्हणून दिला तर? कदाचित तुम्हाला ही कल्पना स्पप्न वाटेल. पण खरचं वास्तवात चीनमधील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष भेट जाहीर केली आहे. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना iPhone 17 Pro Max दिला आहे. यात नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसह इंटर्न्सचा समावेश आहे. मीडियास्टॉर्म असं या कंपनीचे नाव आहे. कंपनीचे सीईओ टिम पॅन यांनी कर्मचाऱ्यांना संदेश पाठवून सांगितले की प्रत्येकाला हा फोन त्यांच्या पसंतीच्या रंगात मिळेल आणि कंपनी आयफोनवर लागणारा कर देखील भरेल.
कंपनीतील कर्मचाऱ्यांनी बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या आनंदाचा अनुभव शेअर केला. त्यातील एका कर्मचाऱ्याच्या पोस्टनुसार, ती कॅलिफोर्नियातील अॅपल परिषदेत उपस्थित होती जिथे नवीन आयफोन लाँच झाला होता. त्यानंतर काही वेळातचं तिला बॉसकडून हा संदेश मिळाला. त्यांनी म्हटले की, 'तुम्ही इंटर्न असाल किंवा नुकतेच कंपनीत सामील झाला असाल, सध्या कंपनीतील प्रत्येक कर्मचाऱ्याला iPhone 17 Pro Max मिळेल.'
हेही वाचा - Larry Ellison : 15 वर्षांपूर्वीच्या वचनपूर्तीसाठी करोडोंची संपत्ती दान; सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 'या' दानशूराचं नाव सामील
मीडियास्टॉर्म कंपनीने गेल्या वर्षीही कर्मचाऱ्यांना iPhone 16 Pro आणि Apple Watch दिली होती. कंपनी प्रॉडक्ट रिव्ह्यू आणि ब्लॉगिंगमध्ये माहिर असून, त्यांचे व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म Bilibili वर 12 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. यावेळी कर्मचार्यांनी टिम पॅनचे कौतुक केले आणि त्यांना 'जगातील सर्वोत्तम बॉस' संबोधले.
हेही वाचा - Bangkok Road Sinkhole Video : बँकॉकमध्ये चार पदरी रस्ताच जमिनीत गडप झाला! थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल
चीनमध्ये आयफोन 17 ची किंमत:
iPhone 17: 5,999 युआन (सुमारे 74,482 रुपये)
iPhone 17 Pro: 8,999 युआन (सुमारे 1,11,729 रुपये)
iPhone 17 Pro Max: 9,999 युआन (सुमारे 1,24,144 रुपये)
iPhone Air: 7,999 युआन (सुमारे 99,313 रुपये)
या निर्णयामुळे मीडियास्टॉर्ममधील कर्मचारी आनंदी असून त्यांचा कंपनीमध्ये काम करण्याचा उत्साह वाढला आहे. मीडियास्टॉर्म ही एक चिनी मीडिया कंपनी आहे, जी मुख्यतः शैक्षणिक सामग्री निर्माण करण्यासाठी ओळखली जाते. ही कंपनी झेजियांग प्रांतातील हांगझोऊ शहरात स्थित आहे. या कंपनीचे संस्थापक व सीईओ टिम पॅन हे आहेत.