World’s Most Expensive Perfume : बापरे! ‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा परफ्यूम; किंमत ऐकून लावाल डोक्याला हात

तुम्हाला माहित आहे का? जगात असेही काही परफ्यूम आहेत, ज्यांच्या एका बाटलीच्या किमतीत तुम्ही आलिशान बंगला किंवा अनेक लक्झरी गाड्या खरेदी करू शकता.

World’s Most Expensive Perfume : बापरे! ‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा परफ्यूम; किंमत ऐकून लावाल डोक्याला हात

World's Most Expensive Perfume :  आज 17 फेब्रुवारी, म्हणजेच 'परफ्यूम डे'. आपल्या आवडत्या व्यक्तीला सुगंधाची भेट देऊन नात्यात ताजेपणा आणण्याचा हा दिवस. पण तुम्हाला माहित आहे का? जगात असेही काही परफ्यूम आहेत, ज्यांच्या एका बाटलीच्या किमतीत तुम्ही आलिशान बंगला किंवा अनेक लक्झरी गाड्या खरेदी करू शकता. या परफ्यूमची किंमत केवळ त्यांच्या सुगंधामुळे नाही, तर त्यावरील हिरे आणि सोन्याच्या सजावटीमुळे कोट्यवधींच्या घरात गेली आहे.

1. 'शुमूख' (Shumukh): जगातील सर्वात महागडा सुगंध
दुबईच्या 'नबील परफ्यूम्स'ने तयार केलेला शुमूख (Shumukh) हा सध्या जगातील सर्वात महागडा परफ्यूम आहे.
किंमत: तब्बल 12.9 दशलक्ष डॉलर (सुमारे 11.7 कोटी रुपये).
वैशिष्ट्य: याची 3 लिटरची बाटली म्हणजे कलेचा एक नमुना आहे. यावर 3,500 पेक्षा जास्त हिरे, मोती, शुद्ध सोने आणि चांदी जडवण्यात आली आहे. यात ऊद, चंदन आणि तुर्की गुलाबासारख्या दुर्मिळ घटकांचा वापर केला असून, याचा सुगंध दीर्घकाळ टिकतो.

2. गोल्डन डेलिशियस (Golden Delicious): सफरचंदाच्या आकाराची 9 कोटींची बाटली
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर 'डीकेएनवाय'चा (DKNY) गोल्डन डेलिशियस मिलियन डॉलर परफ्यूम येतो.
किंमत: सुमारे 9 कोटी रुपये.
डिझाइन: 2011 मध्ये लाँच झालेल्या या परफ्यूमची बाटली सोन्याच्या सफरचंदासारखी दिसते. यावर 3,000 मौल्यवान रत्ने अत्यंत कलाकुसरीने बसवण्यात आली आहेत.

हेही वाचा – World's Most Expensive Rice : एक किलो तांदळाच्या किंमतीत खरेदी कराल स्मार्टफोन; 'हा' आहे जगातील सर्वात महागडा तांदूळ, पण इतका महाग का?

3. क्लाइव्ह ख्रिश्चन नं. 1 (Imperial Majesty)
ब्रिटीश डिझाइनर क्लाइव्ह ख्रिश्चन यांचा इम्पेरियल मॅजेस्टी हा तिसऱ्या क्रमांकाचा महागडा परफ्यूम मानला जातो.
किंमत: अंदाजे 1.9 कोटी रुपये.
वैशिष्ट्य: याच्या केवळ 10 बाटल्या तयार करण्यात आल्या होत्या. बाटलीच्या गळ्यावर 18 कॅरेट सोन्याचा कॉलर आणि 5 कॅरेटचा हिरा बसवलेला असतो. ही बाटली बनवण्यासाठी 'बकारा' क्रिस्टलचा वापर केला जातो. हे सर्व परफ्यूम केवळ सुवासिक नसून ते लक्झरी आणि श्रीमंतीचे प्रतीक मानले जातात. यांच्या किमतीत सुगंधापेक्षा बाटलीवर वापरलेल्या मौल्यवान धातूंना मोठं महत्त्व आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number