Lalit Modi – Vijay Mallya Viral Video: ‘चोरी वर शिरजोरी!’; भारताच्या जखमेवर मीठ चोळणारा मोदी-माल्ल्याचा लंडनमधला ‘तो’ ड्रामा, व्हिडिओ व्हायरल

लंडनमध्ये झालेल्या पार्टीत फरार आर्थिक गुन्हेगार विजय माल्ल्या आणि ललित मोदी एकत्र दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Lalit Modi – Vijay Mallya Viral Video: ‘चोरी वर शिरजोरी!’; भारताच्या जखमेवर मीठ चोळणारा मोदी-माल्ल्याचा लंडनमधला ‘तो’ ड्रामा, व्हिडिओ व्हायरल

लंडन: आयपीएलचे (IPL) गुन्हेगार संस्थापक ललित मोदी आणि हजारो कोटींचे कर्ज बुडवून पळालेले विजय माल्ल्या यांचा निर्लज्जपणा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. विजय माल्ल्याच्या वाढदिवसानिमित्त लंडन मध्ये आयोजित एका पार्टीत हे दोन्ही ‘महाठग’ एकत्र दिसले. विशेष म्हणजे, ज्या देशाच्या जीवावर यांनी माया जमवली, त्याच भारताचा अपमान करण्याची एकही संधी हे दोन्ही फरार सोडत नसल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट झाले आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ललित मोदी मोठ्या मिजाशीत स्वतःचा आणि माल्ल्याचा उल्लेख भारताचे “सर्वात मोठे फरार” (Biggest fugitives) असा करताना दिसत आहेत. केवळ एवढ्यावरच न थांबता, “आम्हाला पाहून जळा,” अशा आशयाचे चिथावणीखोर कॅप्शन देऊन ललित मोदीने भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. भारतीय कायद्याला आणि तपास यंत्रणांना उघडपणे वाकुल्या दाखवणाऱ्या या दोन्ही भगोड्यांच्या मस्तीमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून, नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

हेही वाचा: Libyan Army Plane Crash: आकाशात मोठा स्फोट अन् सगळंच संपलं; लिबियाच्या लष्करप्रमुखांच्या विमान अपघाताचे गूढ वाढले

एकीकडे हे दोघे लंडनमध्ये ऐषारामी पार्ट्या करत भारताची खिल्ली उडवत आहेत, तर दुसरीकडे भारतीय न्यायालये त्यांना वठणीवर आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. योगायोगाने, ज्या दिवशी हा निर्लज्जपणाचा व्हिडिओ समोर आला, त्याच दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने विजय माल्ल्याला कडक शब्दांत फटकारले. “आधी भारतात परत येण्याची तारीख सांगा, तरच तुमच्या याचिकांवर सुनावणी घेऊ,” अशा शब्दांत न्यायालयाने माल्ल्याचा माज उतरवला आहे. मात्र, तरीही हे आर्थिक गुन्हेगार परदेशात बसून भारतीय Central Bureau of Investigation (CBI) आणि Enforcement Directorate (ED) च्या हतबलतेवर हसत आहेत.

विजय माल्ल्या 2016 पासून बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून लंडनमध्ये आश्रयाला आहे, तर ललित मोदी 2010 पासून आयपीएलमधील करचोरी आणि मनी लाँडरिंगच्या (Money Laundering) आरोपांमुळे फरार आहे. ललित मोदीवर तर प्रक्षेपणाचे हक्क मिळवून देण्यासाठी 125 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा गंभीर आरोप आहे. चोरी तर केलीच, पण आता वरून ही ‘शिरजोरी’ पाहून भारतीय नागरिक संतप्त झाले असून, अशा पळकुट्या गुन्हेगारांना लवकरात लवकर खेचून आणण्याची मागणी जोर धरत आहे.

एका गुन्हेगाराने दुसऱ्या गुन्हेगाराचे कौतुक करणे आणि देशाला तुच्छ लेखणे, यावरून या दोघांची वैचारिक पातळी किती खालावलेली आहे हे दिसून येते. या व्हिडिओमुळे केवळ इंटरनेटवर खळबळ उडाली नसून, भारताच्या आर्थिक व्यवस्थेला लुटून पळालेल्या या जोडीचा खरा आणि कुरूप चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

हेही वाचा: Viral Video: मुंबई पोलिसांची अब्रू वेशीवर, पोलिसानंच तरुणीची छेड काढल्याचा आरोप

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number