Tuesday, November 11, 2025 11:11:50 PM

Viral Video: शेतकरी बापाने मुलीच्या स्कुटीसाठी जमा केली 40 हजारांची नाणी, पोतं घेऊन थेट शोरुममध्ये पोहोचला

शेतकरी बापाने मुलीची इच्छा पूर्ण केली आहे. थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण गरीब बापाने सत्यात उतरवून दाखवली. या शेतकरी बापानं पै-पै जोडून तब्बल 40 हजार रुपये जमा केले.

viral video शेतकरी बापाने मुलीच्या स्कुटीसाठी जमा केली 40 हजारांची नाणी पोतं घेऊन थेट शोरुममध्ये पोहोचला

मुंबई: मुलांसाठी बाप काहीही करुन त्यांची इच्छा पूर्ण करतो, हे आपण ऐकत आणि बघत आलो आहोत. मात्र आता एक अशीच घटना घडली आहे. एका शेतकरी बापाने मुलीची इच्छा पूर्ण केली आहे. थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण गरीब बापाने सत्यात उतरवून दाखवली. या शेतकरी बापानं पै-पै जोडून तब्बल 40 हजार रुपये जमा केले. जमा केलेल्या नाण्यांचं पोतं आणि मुलीला घेऊन तो थेट स्कुटीच्या शो रुममध्ये गेला.

काहीवेळा स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी फक्त हिंमत, कष्ट आणि प्रामाणिक इच्छाशक्तीची गरज असते. शेतकरी कुटुंबाने केवळ मेहनत आणि जिद्दीच्या बळावर आपले स्वप्न पूर्ण केलं आहे. शेतकरी बापानं पोरीसाठी चक्क नाणी देऊन स्कुटर खरेदी केली. सुरुवातीला इतकी नाणी पाहून घाम फुटला पण नंतर वेगळा आनंदही शोरुममधील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर होता. एका शेतकरी बापानं आपला मुलीला इतक्या कष्टानं हे गिफ्ट दिलं.   
हेही वाचा: Delhi Taj Hotel: ताज हॉटेलमध्ये कोल्हापुरी चप्पल आणि मांडी घालून बसण्यावरून महिलेला अपमानास्पद वागणूक, व्हिडीओ शेअर करत महिला संतापली

छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात एका शेतकरी कुटुंबाने आपल्या अपार मेहनतीने मुलाच्या शिक्षणासाठी स्कूटी खरेदी करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांत रोजच्या कमाईतून जमवलेली रक्कम घेऊन ते शोरूममध्ये पोहोचले. विशेष म्हणजे, काही रक्कम ही कॅशमध्ये तर काही रक्कम ही नाण्यांमध्ये होती. एक दोन नाही तर तब्बल 40 हजार रुपयांची 10-20 ची नाणी त्यांनी जमा केली होती. जशपूर जिल्ह्यातील बसंतपूर गावचे रहिवासी असलेले शेतकरी रामलाल यादव हे आपल्या कुटुंबासोबत जिल्ह्यातील 'देवनारायण होंडा' शोरूममध्ये नवी स्कूटी खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत नाण्यांनी भरलेली एक मोठी गोण होती. 40 हजार रुपयांच्या या नाण्यांमध्ये 10 आणि 20 रुपयांच्या नाण्यांचा मोठा सहभाग होता. रामलाल, त्यांची पत्नी सुनीता, मुलगा अजय आणि मुलगी राणी हे सर्वजण शोरूममध्ये हजर होते. त्यांनी गोणी उघडताच शोरूममधील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. हे नाणे मोजण्यासाठी कर्मचाऱ्यांना अनेक तास लागले.

शेतकरी भावूक 
"आमचं कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. मुलीचं लग्न झाल्यावर आता मुलाला शिक्षणासाठी स्कूटीची गरज होती. गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही कुटुंबातील प्रत्येकाने मेहनत केली. घरातल्या प्रत्येक सदस्याने यासाठी योगदान दिले. नाणी जमा करत गेलो. अखेर 40 हजार रुपये नाणी आणि बाकीच्या नोटा घेऊन आम्ही स्कूटी घेण्यासाठी इथे आलो." रामलाल यांना हे बोलताना भरुन आलं होतं. 


सम्बन्धित सामग्री