Ganpati idol viral video: ‘आत्ता 100 रुपये घ्या, उरलेले काम करून देईन’; बाप्पाला घरी नेण्यासाठी चिमुकल्याचे मूर्तिकाराला अनोखे आश्वासन, निरागस भक्तीने नेटकरी भावूक

या व्हिडीओत एक चिमुकला आपल्या 2 ते 3 मित्रांसोबत मूर्ती खरेदीसाठी आल्याचे दिसते. तेथे त्याला एक छोटीशी मूर्ती आवडते, जिची किंमत 200 रुपये असते. मात्र, हातात पुरेसे पैसे नसल्याने तो अगदी निरागसपणे..

Ganpati idol viral video: ‘आत्ता 100 रुपये घ्या, उरलेले काम करून देईन’; बाप्पाला घरी नेण्यासाठी चिमुकल्याचे मूर्तिकाराला अनोखे आश्वासन, निरागस भक्तीने नेटकरी भावूक

Ganpati Idol Viral Video: गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे सध्या देशभरात बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. घराघरांमध्ये सजावट आणि मोदकांची लगबग पाहायला मिळत असून सार्वजनिक मंडळेही स्वागतासाठी सज्ज झाली आहेत. अशाच उत्साही वातावरणात सोशल मीडियावर एका लहान मुलाचा अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या घरी गणपतीची स्थापना करण्याची तीव्र इच्छा मनात बाळगून हा चिमुकला थेट मूर्तिकाराच्या कार्यशाळेत पोहोचला. आई-वडील गरीब असल्यामुळे आणि खिशात पुरेसे पैसे नसतानाही, बाप्पाला घरी नेण्यासाठी या चिमुकल्याने दाखवलेली जिद्द आणि भक्ती पाहून सर्वच जण भावूक झाले आहेत.

200 रुपयांच्या मूर्तीसाठी चिमुकल्याचे मूर्तिकाराला अनोखे आश्वासन
इन्स्टाग्रामवरील ‘mr.suhahas’ या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एक निरागस मुलगा आपल्या 2 ते 3 मित्रांसोबत मूर्ती खरेदीसाठी आल्याचे दिसते. तेथे त्याला एक छोटीशी मूर्ती आवडते, जिची किंमत 200 रुपये असते. मात्र, हातात पुरेसे पैसे नसल्याने तो अत्यंत निरागसपणे मूर्तिकाराला विनवणी करतो की, ‘आत्ता 100 घ्या अन् उरलेले 100 मी उद्या आणून देतो, तुम्ही मूर्तीचे बुकिंग करून ठेवा.’ जेव्हा मूर्तिकार त्याला पैसे कुठून आणणार असा प्रश्न विचारतो, तेव्हा ‘मी काहीतरी काम करेन, मेहनत करून पैसे गोळा करेन आणि तुम्हाला देईन,’ असे उत्तर हा मुलगा देतो. त्याच्या या प्रामाणिक प्रयत्नाने खरी भक्ती गरिबी-श्रीमंतीच्या पलीकडे असते हेच पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

हेही वाचा – Weather Update : गणेशभक्तांनो छत्री तयार ठेवा! राज्यात पावसाचा जोर वाढणार; मुंबईसह कोकणाला यलो अलर्ट, विदर्भ, मराठवाड्यात काय अंदाज?

सोशल मीडियावर व्हिडीओची धूम; 10000 हून अधिक व्ह्यूज अन् नेटिझन्सकडून कौतुक
हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून आतापर्यंत 10000 पेक्षा जास्त लोकांनी तो पाहिला आहे. 2000 हून अधिक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर आपल्या भावना व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्वकष्टाने कमावलेल्या पैशांनी बाप्पाची स्थापना करण्याचा संकल्प करणाऱ्या या लहान मुलाचे नेटकऱ्यांकडून भरभरून कौतुक केले जात आहे. व्हिडीओ शेअर करणाऱ्या युझरने आश्वासन दिले आहे की, या व्हिडीऊमुळे जेवढे फॉलोअर्स वाढतील, तितक्या रुपयांची मूर्ती या मुलाला भेट दिली जाईल.

मदतीचा ओघ सुरू; नेटकऱ्यांनी व्यक्त केली मूर्तीचे पैसे देण्याची इच्छा
या चिमुकल्याच्या भाबड्या भक्तीने प्रभावित होऊन अनेक सोशल मीडिया युझर्सनी त्याला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. ‘jeevanganpatichandane’ या युझरने ‘काम करून पैसे आणणारा हा मुलगा मनापासून भक्ती करतो, बाप्पा या लेकरांना सुखी ठेवो’ अशी प्रार्थना केली आहे. तर ‘abhijeetkanade2025’ या युझरने ‘कुठलीही अट न ठेवता मी या मूर्तीचे पैसे देतो, त्याला आवडेल ती मूर्ती द्या’ अशी इच्छा व्यक्त केली आहे. हा चिमुकला खऱ्या अर्थाने बाप्पाचा खराखुरा भाविक असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

हेही वाचा – Ganesh Utsav Song: अंगात ताप भरलेला, तरी मोहम्मद रफी यांनी गायले गणपतीचे ‘ते’ गाणे; आजही गणेशोत्सवात कायम आहे क्रेझ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number