HSRP Number Plate: राज्यातील वाहनधारकांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) संदर्भात महत्त्वाची अपडेट आली आहे. सरकारने तीन वेळा अंतिम मुदत वाढवूनही अजूनही लाखो वाहनधारकांनी नोंदणी केली नाही. 30 नोव्हेंबर 2025 ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट नोंदणीसाठी शेवटची तारीख आहे. यानंतर ही नंबर प्लेट न बसवणाऱ्यांना मोठा दंड भरावा लागणार आहे.
हेही वाचा – Google New Technology: Google च्या TPU चिप्समुळे Nvidia ला मोठा धक्का
प्राप्त माहितीनुसार, एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना HSRP बसवणे बंधनकारक आहे. ज्या वाहनमालक आधीच नोंदणी करूनही नंबरप्लेट बसवली नाही त्यांना 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तर ज्यांनी आजपर्यंत अर्जदेखील केला नाही, त्यांना थेट 10,000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे उशीर न करता लगेच नोंदणी केल्यास 9,000 रुपयांचे नुकसान टाळता येईल. सध्या बुकिंग केलेल्या 56 हजार वाहनांवर प्लेट बसवण्याचे काम सुरू आहे. मात्र राज्यात लाखो वाहने अजूनही या प्रक्रियेत सहभागी नाहीत.
याआधी सरकारने 30 एप्रिल 2025, 15 ऑगस्ट 2025 आणि 30 नोव्हेंबर 2025 अशा तीन टप्प्यांत मुदतवाढ दिली आहे. चौथ्या वेळीदेखील मुदतवाढ मिळण्याची शक्यता प्रशासन व्यक्त करत आहे आणि 31 डिसेंबरपर्यंत तारीख वाढण्याची चर्चा सुरू आहे. मात्र अधिकृत आदेश अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. HSRP ही सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची ॲल्युमिनियमची नंबर प्लेट आहे. यावर अशोक चक्र होलोग्राम, लेसर-इन्कोडेड 9 अंकी युनिक आयडी, तसेच नॉन-रिमुव्हेबल स्नॅप लॉक असते. या प्लेटमुळे वाहन चोरी, नंबरप्लेट छेडछाड आणि गैरवापर रोखण्यास मोठी मदत होते.