WhatsApp Privacy Update: व्हॉट्सॲपचा ऐतिहासिक निर्णय; आता फोन नंबरशिवाय करता येणार चॅटिंग, सुरक्षेसाठी येणार आणलं ‘हे’ खास फीचर

या नव्या सुविधेमुळे आता व्हॉट्सॲपवर संवाद साधण्यासाठी कोणालाही आपला वैयक्तिक फोन नंबर देण्याची सक्ती असणार नाही.

WhatsApp Privacy Update: व्हॉट्सॲपचा ऐतिहासिक निर्णय; आता फोन नंबरशिवाय करता येणार चॅटिंग, सुरक्षेसाठी येणार आणलं ‘हे’ खास फीचर

WhatsApp Privacy Update: जगातील सर्वाधिक पसंतीचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सॲपने वापरकर्त्यांच्या गोपनीयतेच्या (Privacy) दृष्टीने आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि क्रांतिकारी बदल करण्याची घोषणा केली आहे. या नव्या सुविधेमुळे आता व्हॉट्सॲपवर संवाद साधण्यासाठी कोणालाही आपला वैयक्तिक फोन नंबर देण्याची सक्ती असणार नाही. वापरकर्ते आता फोन नंबरऐवजी थेट 'युजरनेम' (Username) वापरून एकमेकांशी चॅट करू शकणार आहेत. कंपनीने या वैशिष्ट्याची अधिकृत घोषणा केली असून, वापरकर्त्यांसाठी त्यांचे अनोखे युजरनेम बुक करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे.

युजर्सच्या प्रायव्हसीची मोठी चिंता मिटणार
जगभरात 3 अब्जांपेक्षा जास्त युजर्स असलेल्या व्हॉट्सॲपवर आजवरची सर्वात मोठी त्रुटी म्हणजे, तुमचा फोन नंबर असलेल्या कोणत्याही व्यक्तीला थेट मेसेज करता येत होता. यामुळे युजर्सच्या, विशेषतः महिलांच्या गोपनीयतेचा प्रश्न निर्माण होत असे. या नव्या सुविधेमुळे आता युजर्स आपला फोन नंबर लपवून, केवळ युजरनेमच्या माध्यमातून इतरांना संपर्काचा पर्याय देऊ शकतील. व्हॉट्सॲपच्या 'प्रोडक्ट' विभागाच्या उपाध्यक्षा ॲलिस न्यूटन-रेक्स यांनी स्पष्ट केले की, वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊनच हे मुख्य प्रायव्हसी फीचर तयार करण्यात आले आहे.

सर्च डिरेक्टरी नसणार; 'असे' काम करेल हे नवे फीचर
व्हॉट्सॲपचे हे नवीन युजरनेम फीचर अत्यंत सुरक्षित पद्धतीने काम करेल. इन्स्टाग्राम किंवा इतर सोशल मीडियासारखी व्हॉट्सॲपवर युजरनेम शोधण्यासाठी कोणतीही खुली यादी (Directory) नसेल, तसेच नाव टाईप करताना ॲप कोणताही सुगावा किंवा सजेशन देणार नाही. याचा अर्थ, जर एखाद्या अनोळखी व्यक्तीला तुमच्याशी पहिल्यांदा संपर्क साधायचा असेल, तर त्याला तुमचे अचूक युजरनेम माहीत असणे बंधनकारक असेल. सध्या अनोळखी कॉल्स सायलंट किंवा ब्लॉक करण्याची सुविधा उपलब्ध असली, तरी हे नवीन अपडेट युजर्सच्या सुरक्षेला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल.

सेलिब्रिटी आणि संस्थांसाठी विशेष सुरक्षा; तोतयागिरीला बसेल लगाम
अनेकदा प्रसिद्ध व्यक्ती आणि ब्रँड्स आपले ऑनलाइन नाव सुरक्षित ठेवण्यासाठी उत्सुक असतात. हे लक्षात घेऊन कंपनीने ही बुकिंग प्रक्रिया आधीच सुरू केली आहे. ज्या कंपन्या, संस्था किंवा डिजिटल क्रिएटर्सचे इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर आधीच व्हेरिफाइड अकाउंट्स आहेत, त्यांना व्हॉट्सॲपवरही तेच नाव मिळवण्याची सुवर्णसंधी दिली जाईल.

हेही वाचा- Social Media Ban: सोशल मीडिया कंपन्यांना मोठा झटका; सरकारने बंद केली YouTube आणि TikTok ची 47 लाख खाती

या युजरनेमची लांबी 3 ते 35 अक्षरांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, राजकारणी, सेलिब्रिटी आणि सरकारी संस्थांच्या नावाचा वापर करून कोणी फसवणूक किंवा तोतयागिरी करू नये, यासाठी व्हॉट्सॲप त्यांची युजरनेम्स आधीच राखून (Reserve) ठेवणार आहे. सुरक्षेचा हा नवा महाकोश पुढील काही महिन्यांत जगभरातील सर्व सामान्य वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिला जाईल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number