Tuesday, November 18, 2025 09:10:02 PM

Fridge Temperature Guide: हिवाळ्यात फ्रिज बंद करू नका! फक्त हे सेटिंग बदला आणि विजेची बचत करा

हिवाळ्यात फ्रिजची गरज कमी असली तरी ते बंद करणे धोकादायक ठरू शकते. योग्य टेंपरेचर सेट केल्यास विजेचा वापर कमी होतो, अन्न गोठत नाही आणि फ्रिजमध्ये दुर्गंधीही राहत नाही.

fridge temperature guide हिवाळ्यात फ्रिज बंद करू नका फक्त हे सेटिंग बदला आणि विजेची बचत करा

Fridge Temperature Guide: हिवाळा सुरू झाला की घरातील अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर नैसर्गिकरित्या कमी होतो. त्यातील सर्वात मोठा उदाहरण म्हणजे फ्रिज. कारण बाहेर पडणारी थंडीच अनेक अंशी अन्नद्रव्ये टिकवून ठेवण्याचे काम करते. त्यामुळे अनेक घरी या सीझनमध्ये फ्रिजचं दार कमीत कमी उघडलं जातं आणि काहीजण तर आठवड्यातील काही दिवस फ्रिज बंद ठेवतात. पण तज्ज्ञांच्या मते हा पर्याय बिलकुल योग्य नाही. फ्रिज पूर्णपणे बंद करून ठेवला तर त्यात दुर्गंधी निर्माण होऊ शकते, ओलसरपणा वाढू शकतो आणि अन्नपदार्थ लवकर खराब होऊ शकतात. शिवाय पुन्हा सुरू करताना कंप्रेसरवर जास्त भार पडतो. म्हणून फ्रिज वापरणे थांबवण्यापेक्षा टेंपरेचर योग्यप्रकारे कमी करणे हेच योग्य.

हिवाळ्यात फ्रिजमध्ये टेंपरेचर कसे ठेवावे हा नेहमीचा प्रश्न असतो. उन्हाळ्यात आपण सहसा टेंपरेचर हाय कूलिंगवर ठेवतो. पण हिवाळ्यात जर हेच सेटिंग वापरायचे ठरवले तर फ्रिजमध्ये ठेवलेलं दूध, भाजी, फळं, सॉसेस हे सर्व पटकन गोठू शकतात. त्यामुळे फ्रिजचे सेटिंग कमी करणे गरजेचे असते. जर तुमचा फ्रिज जुना मॉडेल असेल आणि त्यात 1 ते 5 क्रमांकाची मॅन्युअल नॉब सेटिंग असेल तर हिवाळ्यात ही नॉब 2 किंवा 3 वर ठेवणे अधिक योग्य. आणि जर तुमचा फ्रिज आधुनिक डिजिटल डिस्प्ले असलेला असेल तर 3°C ते 4°C हे तापमान आदर्श मानले जाते.

ही लहानशी सेटिंग बदलण्याने एकाच वेळी दोन महत्वाचे फायदे मिळतात. पहिले म्हणजे अन्न फ्रीजमध्ये जास्त थंडामुळे गोठत नाही आणि सहज वापरता येते. दुसरे म्हणजे कंप्रेसर कमी वेळ चालत असल्याने विजेचा वापर कमी होतो. थंड हवामानात बाहेरील टेंपरेचरचं कोल्ड सपोर्ट फ्रिजला मिळत असल्यामुळे कूलिंग मिळवण्यासाठी फ्रिजला जास्त मेहनत करावी लागत नाही आणि आपल्या विजेच्या बिलात प्रत्यक्षात फरक पडतो.

फ्रिज बंद केल्याने ज्या समस्या निर्माण होतात त्या सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे अन्नावर वेगाने बुरशी बसण्याची शक्यता. शिवाय फ्रिजच्या आतली ओल निघत नाही आणि आतील भिंती, रबर गॅस्केट यावर देखील वास बसतो. त्यामुळे एकदा फ्रिज पुन्हा सुरू करायचा असेल तर त्याला पूर्ण साफ करावे लागते. त्यामुळे वापर कमी झाला तरीही उपकरण सुरु ठेवणे फायदेशीर आहे. परंतु योग्य टेंपरेचर सेट करणं हे मुख्य.

 


सम्बन्धित सामग्री