Gmail Password Leak: जगभरातील ईमेल वापरकर्त्यांना हादरवणारी माहिती समोर आली आहे. सायबर सुरक्षा तज्ञ ट्रॉय हंट (Troy Hunt) यांनी उघड केले आहे की तब्बल 183 दशलक्ष ईमेल आणि पासवर्ड ऑनलाइन लीक झाले आहेत. या डेटामध्ये Gmail, Yahoo, Outlook यांसह अनेक लोकप्रिय ईमेल सेवांचे लॉगिन तपशील आहेत.
ही माहिती Have I Been Pwned या साइटवर अपडेट करण्यात आली असून, एकूण 3.5 टेराबाइट डेटा चोरीला गेला असल्याचे सांगण्यात आले आहे. सायबर तज्ञांच्या मते, हा डेटा InfoStealer Malware Logs मधून मिळाला आहे. म्हणजेच मालवेअरने संक्रमित झालेल्या उपकरणांमधून वापरकर्ता नाव, पासवर्ड आणि वेबसाइट पत्ते चोरले गेले आहेत.
हेही वाचा - एआय जगतात मोठी स्पर्धा! ChatGPT चा 'हा' प्लॅन आता वर्षभरासाठी मोफत; OpenAI कडून घोषणा, 'या' तारखेपासून सुरुवात
काय आहे या लीकचा धोका?
या डेटामध्ये आधी कधीही न पाहिलेले 16.4 दशलक्ष ईमेल खाते आहेत. हे लीक 'नवीन Gmail हॅक' नसून, वेगवेगळ्या सायबर हल्ल्यांमध्ये चोरी झालेल्या माहितीचा एकत्रित संग्रह आहे. तरीही, जे लोक अनेक साइट्सवर समान पासवर्ड वापरतात, त्यांच्यासाठी हा गंभीर धोका आहे. सायबर सुरक्षा तज्ञांनी सल्ला दिला आहे की वापरकर्त्यांनी तात्काळ आपला पासवर्ड बदलावा, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) सुरू करावे आणि HaveIBeenPwned.com वर आपला ईमेल तपासावा.
हेही वाचा - RBI Silver Loan Rules: सोन्याप्रमाणे चांदी गहाण ठेवता येते का? काय आहेत RBI चा नियम? जाणून घ्या
Google काय म्हणते?
Google ने या दाव्यांचे खंडन केले आहे. कंपनीने X (माजी ट्विटर) वर अधिकृतपणे म्हटले आहे की, 'Gmail वर मोठ्या प्रमाणात सुरक्षा उल्लंघन झाले असल्याचे दावे पूर्णपणे चुकीचे आहेत. Gmail चे सुरक्षा यंत्रणा मजबूत आहेत आणि वापरकर्ते सुरक्षित आहेत. हे चुकीचे अहवाल ‘InfoStealer’ डेटाबेसच्या गैरसमजातून आले आहेत. हा डेटाबेस वेगवेगळ्या चोरी झालेल्या क्रेडेन्शियल्सचा संग्रह आहे, Gmail वरील नवीन हल्ला नाही.'