ZP Election 2026 : आमदार नितेश राणेंची रणनिती फळाला; निवडणुकीआधीच महायुतीची 25 जागांवर बिनविरोध निवड, वाचा सविस्तर यादी

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच कोकणात महायुतीच्या तब्बल 25 जागा बिनविरोध निवडून आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ZP Election 2026 : आमदार नितेश राणेंची रणनिती फळाला; निवडणुकीआधीच महायुतीची 25 जागांवर बिनविरोध निवड, वाचा सविस्तर यादी

कणकवली : राज्यात महापालिका निवडणुकींचा रणधुमाळी झाल्यानंतर अद्याप महापालिकांवर महापौरदेखील बसलेले नसतानाच महायुतीला आणखी एक मोठं यश हाती लागलं आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीनं सर्वाधिक जागांवर नगरसेवक निवडून आणले. यापैकी बऱ्याच जागांवर त्यांच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती. या गोष्टीची पुनरावृत्ती आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींमध्ये पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच कोकणात महायुतीच्या तब्बल 25 जागा बिनविरोध निवडून आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामध्ये आमदार आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मोलाचा वाटा असल्याचे बोलले जात आहे. 

येत्या 5 फेब्रुवारी रोजी राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितींसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र त्याआधीच महायुतीने कोकणात मोठ यशं मिळवलं आहे. जिल्हा परिषदेच्या 8 जागा तर पंचायत समितींच्या 17 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. एकूण 50 सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे 7 आणि शिंदे गटाचा 1 सदस्य बिनविरोध विजयी झाला. तर 100 सदस्यसंख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये भाजपचे 16 आणि शिंदे शिवसेनेचा 1 सदस्य बिनविरोध विजयी झाला आहे. वाचा सविस्तर यादी –

हेही वाचा : Eknath Shinde Vs Ganesh Naik : नाईक-शिंदे वादात आणखी एका नेत्याची उडी! ‘बेताल वक्तव्य करणाऱ्या गणेश नाईकांना आवरा’

जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग (8 बिनविरोध )

1) खारेपाटण – प्राची इस्वालकर (भाजप)
2) बांदा – प्रमोद कामत (भाजप)
3) जाणवली – रुहिता राजेश तांबे (भाजप कार्यकर्ती, शिवसेना उमेदवार)
4) पडेल – सुयोगी रविंद्र घाडी (भाजप)
5) बापर्डे – अवनी अमोल तेली (भाजप)
6) पोंगुर्ले – अनुराधा महेश नारकर (भाजप)
7) किंजवडे – सावी गंगाराम लोके (भाजप)
8) कोळपे – प्रमोद पुंडलिक रावराणे (भाजप)

पंचायत समिती, कणकवली (6 बिनविरोध)

1) वरवडे – सोनू सावंत (भाजप)
2) नांदगाव – हर्षदा हनुमंत वाळके (भाजप)
3) जाणवली – महेश्वरी महेश चव्हाण (भाजप)
4) बिडवाडी – संजना संतोष राणे (भाजप)
5) हरकुळ बुद्रुक – दिव्या दिनकर पेडणेकर (भाजप)
6) नाटळ – सायली संजय कृपाळ (भाजप)

पंचायत समिती, देवगड तालुका (6 बिनविरोध)

1) पडेल – अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)
2) नाडण – गणेश सदाशिव राणे (भाजप)
3) बापर्डे – संजना संजय लाड (भाजप)
4) फणसगाव – समृद्धी संतोष चव्हाण (भाजप)
5) शिरगाव – शीतल सुरेश तावडे (भाजप)
6) कोटकामते – ऋतुजा राकेश खाजनवाडकर (भाजप)

पंचायत समिती, वैभववाडी (1 बिनविरोध)

1) कोकिसरे – साधना सुधीर नकाशे (भाजप)

पंचायत समिती, वेंगुर्ले (1 बिनविरोध)

1) आसोली – संकेत धुरी (भाजप)

पंचायत समिती, मालवण (1 बिनविरोध)

1) अडवली मालडी – सीमा सतीश परुळेकर (भाजप)

पंचायत समिती, सावंतवाडी (1 बिनविरोध)

1) शेरले – महेश धुरी (भाजप)

पंचायत समिती, दोडामार्ग (1 बिनविरोध)

1) कोलझर – गणेश प्रसाद गवस (शिंदे सेना)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number