Wardha : वर्धा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आलेली आहे. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अवघ्या 26 वर्षीय तरुणाला आपला जीव तरुण वयातच गमवावा लागला आहे. हा भीषण अपघात सेलू तालुक्यातील कान्होली बारा ते जुनगड या मार्गावर घडला आहे.
कसा घडला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ सावरकर असे मृत तरुणाचे नाव असून तो कान्होली बारा येथून जुनगडकडे आपल्या दुचाकीवरुन जात होता, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान,जुनगड चौकाजवळ समोरुन येणाऱ्या भरधाव कारने त्याच्या दुचाकीला अतिशय जोरदार धडक दिली होती. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा चक्काचूर झाला आणि एकनाथ हा गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडला.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. त्यानंतर त्यांनी गंभीर अवस्थेत असलेल्यया एकनाथला सेलू ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या अपघातानंतर मृत तरुणाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून जवळच्या मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली असून, कार पुढील तपास सुरु केवा आहे.दरम्यान, कान्होली बारा ते जुनगड या मार्गावर वारंवार अपघात होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आबे. या मार्गावर वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास सेलू पोलीस करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.