नवी दिल्ली : दिल्लीतील खासगी रुग्णालयात २३ वर्षांच्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. तरुणाच्या लहान आतड्यातून डॉक्टरांनी एक तीन सेंटीमीटर आकाराचे झुरळ बाहेर काढले. आतड्यातून बाहेर काढलेले झुरळ त्यावेळी जिवंत होते, असे डॉक्टरांनी सांगितले. प्रगत एंडोस्कोपिक तंत्राचा वापर करुन लहान आतड्यातून झुरळ बाहेर काढल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
तरुण मागील काही दिवसांपासून पोटात वेदना होत असल्याची आणि अन्न पचनात अडचणी येत असल्याची तक्रार करत होता. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया करुन तरुणाच्या लहान आतड्यातून डॉक्टरांनी झुरळ बाहेर काढले.