रशियानंतर आता भारताने इस्रायलसोबत एका कराराव सह्या केल्या आहेत. तेल अवीवमध्ये आज भारत आणि इस्राईलच्या संबंध आणखी पुढे नेणारी ऐतिहासिक घटना घडली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल हे सध्या 60 सदस्यीय भारतीय व्यापारी शिष्ठमंडळासह इस्राईलमध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान तेल अवीवमध्ये भारत आणि इस्राईलच्या संबंध आणखी पुढे नेणारी ऐतिहासिक घटना घडली. ज्या मुक्त व्यापार कराराची (FTA) गेली 14 वर्षांच्या प्रतिक्षेला अखेर अटी आणि शर्तींसह या कराराला अंतिम स्वरुप देण्यात आले आहे.
या दौऱ्यादरम्यान केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी इस्रायलचे नीर बरकत यांच्याशी सामजंस्य करारावर अधिकृतपणे सह्या केल्या. दोन्ही देशात व्यापारी आकडेवारीत थोडी घसरण होत असताना हा करार झाला आहे. आर्थिकवर्षे 2024-25 दरम्यान भारताने इस्राईलला होणारी निर्यात गेल्या वर्षीच्या 4.52 अब्ज डॉलरच्या तुलनेत घटून 2.14 अब्ज डॉलर राहीली होती. तर आयातीत कपात नोंदली गेली होती. अशात एफटीएच्या अटींवर मोहर लागल्याने दोन्ही देशांचा व्यापार यथायोग्य होणार आहे.
2010 मे पासून भारत आणि इस्राईल या दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करारा संदर्भात बोलण सुरु होत. तर मागील काही काळात या कराराच्या बोलणीला लांबण लागली होती. या करारा संदर्भात आतापर्यंत दोन्ही देशात आठ प्रदीर्घ बैठका झाल्या असून ऑक्टोबर 2021 पासून पुन्हा दोन्ही पक्षांमार्फत बोलणी सुरु झाली आणि अखेर हा करार अंतिम टप्प्यावर पोहचला आहे.
त्याचसोबत भारतातून इस्राईलला मोती, रत्ने, हिरे, मोटार वाहन डिझेल, मशिनरी, टेक्सटाईल, वस्रे आणि कृषी उत्पादने सारख्या पदार्थांची मोठी निर्यात होत होती. या सामंजस्य कराराने भारतीय उत्पादनांची आणखी पोहच वाढणार असून भारतीय निर्माण कंपन्या आणि शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. पीयूष गोयल यांनी इस्राईलची उद्योग मंत्री नीर बरकत यांच्यात द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि नावीन्यपूर्णता (Innovation) वाढवण्यासाटी नव्या मार्गांवर देखील चर्चा झाली. हा सामंजस्य करार दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला नवा वेग देण्याचे काम करणार आहे.