Wednesday, December 11, 2024 01:05:55 PM

Ajit Pawar's emotional post on Diwali goes viral
दिवाळीत अजित पवारांची भावनिक पोस्ट व्हायरल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी दिवाळीच्या शुभेच्छा देत आईसोबतचा फोटो शेअर केला आहे.

दिवाळीत अजित पवारांची  भावनिक पोस्ट व्हायरल

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी दिवाळीच्या शुभेच्छा देत आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. शुभेच्छामध्ये त्यांनी आईच्या वतीने राज्यातील सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. अजित पवार यांच्या आई राजकारणावर कधीच बोलल्या . मात्र, युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा दादाच्या विरोधात अर्ज भरू नका, असे आईंनी कुटुंबियांना सांगितले होते असे अजित पवार यांनी जाहीर भाषणात सांगितले. त्यावर आई असे काही बोलल्या नसतील असा पलटवार युगेंद्र पवार यांचे वडिल श्रीनिवास पवार यांनी केला होता. त्यामुळे अजित पवार यांच्या पोस्टला राजकीय रंग आला आहे. 


काय ट्विट अजित पवारांनी केले ?
माझ्या आणि आईच्या वतीने महाराष्ट्रातील मायमाऊली, शेतकरी, कष्टकरी, युवक - युवती आणि ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे असे ट्वीट अजित पवारांनी केले आहे. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo