Bus Fire Accident: अन् झोपेतच मृत्यूने कवटाळलं! ट्रकला बसची धडक आणि उडाला आगीचा भडका, 13 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Bus Fire Accident:  अन् झोपेतच मृत्यूने कवटाळलं! ट्रकला बसची धडक आणि उडाला आगीचा भडका, 13 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशमध्ये आज गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात अनेक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मार्कापूरमजवळ खासगी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागल्याने किमान 13 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. पहाटे सुमारे 5 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खासगी ट्रॅव्हल्सची बस तेलंगणातील जगित्याल निर्मल येथून आंध्र प्रदेशातील कालिगिरी नेल्लोरकडे जात होती. रेयावरमजवळ समोरून येणाऱ्या वेगवान टिपर ट्रकशी बसची जोरदार धडक झाली.

या धडकेनंतर बसमध्ये अचानक आग लागली आणि काही क्षणांतच संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली. अनेक प्रवासी आत अडकले आणि बाहेर पडू न शकल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला.

हेही वाचा: Strait of Hormuz: भारतासाठी मोठी बातमी! 'होर्मुझ'चा मार्ग मोकळा; युद्धाच्या काळात इराणचा मैत्रीचा हात

अपघातानंतर काही प्रवाशांनी धाडसाने बसमधून बाहेर पडत जीव वाचवला. सुमारे 20 जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आणि जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अपघाताची सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला. प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू होणे अत्यंत वेदनादायक असल्याचे त्यांनी सांगितले. जखमींना योग्य उपचार देण्याचे निर्देश देण्यात आले असून मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. 

हेही वाचा: Namo Shetkari Mahasanman Nidhi: खुशखबर! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मानचे 2000 रुपये जमा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number