Saturday, July 20, 2024 12:57:42 PM

Anna Hazare
अजित पवारांच्या विरोधात अण्णा हजारे

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालेल्या निर्दोषत्वाच्या प्रमाणपत्राला अण्णा हजारे यांनी विरोध केला आहे.

अजित पवारांच्या विरोधात अण्णा हजारे

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालेल्या निर्दोषत्वाच्या प्रमाणपत्राला अण्णा हजारे यांनी विरोध केला आहे. या प्रकरणातील तपास बंद करण्याच्या अहवालाला अण्णा हजारे न्यायालयात आव्हान देणार आहेत. न्यायालयात या प्रकरणात २९ जून रोजी पुढील सुनावणी आहे. अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकील या सुनावणीवेळी अजित पवारांच्या निर्दोषत्वाच्या प्रमाणपत्राला आव्हान देणारा युक्तिवाद करणार असल्याचे समजते. शिखर बँकेच्या २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि इतर आरोपींना ठोस पुरावे नसल्याचे सांगत दिलासा दिला होता. 


सम्बन्धित सामग्री