Bayilone Ballipalike Trending Song : इंस्टा, शॉर्ट्स, रिल्सपासून अगदी लग्नात नवरा-नवरीसुद्धा या गाण्यावर थिरकले; काय आहे खास ‘या’ गाण्यात…

सध्याच्या सोशल मीडिया ट्रेडिंगच्या युगात कोणतीही गोष्ट व्हायरल होण्यास वेळ लागत नाही. एखादं गाणं, नृत्याची सिग्नेचर स्टेप, एखादा डायलॉग येताच त्यावर मिम्स, रिल्स, व्हिडिजोस बनणं, हे आता नित्याचं झालं.

Bayilone Ballipalike Trending Song : इंस्टा, शॉर्ट्स, रिल्सपासून अगदी लग्नात नवरा-नवरीसुद्धा या गाण्यावर थिरकले; काय आहे खास ‘या’ गाण्यात…

सध्याच्या सोशल मीडिया ट्रेडिंगच्या युगात कोणतीही गोष्ट व्हायरल होण्यास वेळ लागत नाही. एखादं गाणं, नृत्याची सिग्नेचर स्टेप, एखादा डायलॉग येताच त्यावर मिम्स, रिल्स, व्हिडिजोस बनणं, हे आता नित्याचं झालं आहे. सोशल मीडिया ट्रेडिंगला ते गाण आणि स्टेप आली की हिट झालीच म्हणून समजा. असच एक युनिक गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. बेयलोन बलिवालाईक या तेलुगू भाषेतील गाण्याने अनेकांना वेड लावलं असून इंस्टाग्राम, रिल्स, शॉट्स, अगदी लग्न समारंभांमध्येही या गाण्यावरील स्टेप्स व्हायरल होत आहेत. मंगली या गायिकेनं हे गाणं गायलं असून व्हिडिओमध्येही मंगलीचं या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. दोन आठवड्यापूर्वी 4.06 मिनिटांचं हे गाणं युट्यूबवर प्रदर्शीत करण्यात आले असून अवघ्या 14 दिवसांत या गाण्याला 2.2 मि. व्हुज मिळाले आहेत. 

कोण आहे गायिका मंगली 

मंगलीचा जन्म आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुटी येथील बंजारा समुदायात झाला. तिने तिरुपती येथील श्री वेंकटेश्वर विद्यापीठातून कर्नाटक संगीतात डिप्लोमा केला. तिच्या वडिलांनी तिला लहानपणापासूनच गायिका बनण्यास प्रोत्साहित केले. तिच्या शिक्षकांकडून प्रेरित होऊन तिला संगीत शिक्षिका व्हायचे होते. टेलिव्हिजन सादरीकरणात करिअर सुरू करण्यासाठी मंगली हैदराबादला गेली. मंगलीची धाकटी बहीण इंद्रावती चौहान हीदेखील गायिका असून तिचे ‘पुष्पा: द राइज ‘ चित्रपटातील “ऊ अंतवा ऊ ऊ अंतवा” हे हिट गायल आहे. इंद्रावतीच्या आवाजातील हे कन्नड भाषेतील गाण चांगलंच लोकप्रिय झालं आहे. मंगली बथुकम्मा, बोनालू आणि तेलंगणा स्थापना दिन यांसारख्या तेलंगणा सणांवर गाणी गाते. 2018 तेलंगणा निर्मिती दिनासाठी तिचे ओरुगल्लू कोटानाडुगु हे गाणे हिट झाले आहे. तिने सप्तगिरी एक्स्प्रेस, राज महल, नीधी नदी ओका कथा, जॉर्ज रेड्डी आणि 2020 मधील ॲक्शन-ड्रामा टॉलीवूड चित्रपट आला वैकुंठपुररामुलू मधील ”रामुलू रामुला” गाणे यांसारख्या काही टॉलिवूड चित्रपटांमध्ये गायले आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये, तिने लक्ष्मी मंचू महाराणी यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भाग घेतला. 2021 मध्ये लव्ह स्टोरी चित्रपटातील तिचे “सारंगा दरिया” हे गाणे खूप लोकप्रिय झाले.

हेही वाचा : Fight Over Rasgulla in Wedding: लग्नात रसगुल्ला खाण्यावरून वाद; वऱ्हाडी मंडळी वधू पक्षाशी भिडली, नंतर लग्नही मोडलं

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number