Hiring Policy and Workplace Safety: महाराष्ट्रात परप्रांतीयांचा वाद पेटलेला असतानाच आता कर्नाटकातून एक धक्कादायक आणि वादग्रस्त प्रकार समोर आला आहे. बंगळुरूस्थित ‘A1 Sports World’ या स्पोर्ट्स कंपनीने उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेश या 4 राज्यांतील पुरुष उमेदवारांना नोकरीवर न ठेवण्याची अधिकृत घोषणा केली आहे. कंपनीच्या या नवीन ‘हायरिंग पॉलिसी’मुळे सोशल मीडियावर प्रांतीय भेदभाव आणि वर्कप्लेस सेफ्टीवरून मोठा गदारोळ माजला असून देशभरातून या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
महिला व बालकांच्या सुरक्षेचे कारण; CEO कार्तिक एस.जी. यांची ‘X’ वर पोस्ट
कंपनीचे संस्थापक आणि सीईओ कार्तिक एस.जी. यांनी 22 सप्टेंबर रोजी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट शेअर करत या निर्णयाचे समर्थन केले. कंपनीत सध्या काम करणाऱ्या एकूण 32 कर्मचाऱ्यांपैकी 14 महिला कर्मचारी असून ही संस्था लहान मुलांचे क्रीडा उपक्रम चालवते. त्यामुळे महिला कर्मचारी आणि लहान मुलांची सुरक्षा हीच आपली सर्वात पहिली प्राथमिकता असल्याचे सांगत त्यांनी या 4 राज्यांतील पुरुषांच्या भरतीवर थेट बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
Im sorry for this… But today we have made it very clear after lengthy discussion and quarrel… We will not hire any male candidates in our company who come from these 4 states in north india… 1. Uttar Pradesh.
2. Rajasthan.
3. Bihar.
4. Madhya Pradesh. We do have 1 Rajasthani already working for us. She has 100% supposed this. — Karthik SG (@kkarthikkgs) September 22, 2026
माजी कर्मचाऱ्याच्या गैरवर्तनामुळे थेट 4 राज्यांतील उमेदवारांवर बंदी
या कठोर निर्णयामागील पार्श्वभूमी सांगताना सीईओ यांनी एका माजी कर्मचाऱ्याचा संदर्भ दिला. दोन आठवड्यांपूर्वी महिला सहकाऱ्यांशी गैरवर्तन आणि बळजबरीचा प्रयत्न केल्यामुळे एका कर्मचाऱ्याला कंपनीतून हकालपट्टी करण्यात आली होती. बॅकग्राउंड व्हेरिफिकेशन नॉर्मल असूनही संबंधित कर्मचाऱ्याने ही कृत्य केल्यामुळे कंपनीने सुरक्षेचा उपाय म्हणून थेट चार प्रमुख राज्यांतील पुरुष उमेदवारांवर ही बंदी लादली आहे.
नेटकऱ्यांकडून जोरदार टीका; निर्णयावर ठाम राहण्याचा CEO चा पुनरुच्चार
एका कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे संपूर्ण प्रदेशातील सर्व पुरुषांना दोषी धरणे अत्यंत अयोग्य असल्याचे सांगत नेटकऱ्यांनी सीईओंवर टीकेची झोड उठवली आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना कार्तिक यांनी स्पष्ट केले की, कंपनीत अजूनही दक्षिण भारताबाहेरील 12 कर्मचारी कार्यरत असून सर्वात जास्त नकारात्मक प्रतिक्रिया बिहारमधून आल्या आहेत. कंपनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणताही तडजोड करणार नसून आपण या निर्णयावर ठाम असल्याचे सीईओ यांनी शेवटी स्पष्ट केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.