नवी दिल्ली: भारत टॅक्सी (Bharat Taxi) हे स्मार्टफोनवर सहज वापरता येणारे मोबाइल-आधारित कॅब बुकिंग प्लॅटफॉर्म (Mobile-based Cab Booking Platform) आहे. सामान्य भारतीय प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन ही सेवा तयार करण्यात आली आहे. सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह (Sahakar Taxi Cooperative) अंतर्गत सुरू होणारी ही सेवा ड्रायव्हरांच्या हितावर आधारित नॅशनल मोबिलिटी कोऑपरेटिव्ह (National Mobility Cooperative) म्हणून ओळखली जात आहे. या अॅपद्वारे स्थानिक (Local) तसेच आऊटस्टेशन (Outstation) प्रवास करता येणार आहे.
भारत टॅक्सीची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे सर्ज प्राइसिंग (Surge Pricing) पूर्णपणे बंद असणे. गर्दीच्या वेळेत किंवा खराब हवामानात भाडे अचानक वाढण्याची अडचण या अॅपमध्ये नसणार आहे. प्रवाशांना आधीच ठरलेले आणि पारदर्शक (Transparent) भाडे दिसणार असल्याने प्रवास अधिक विश्वासार्ह ठरेल, असा दावा करण्यात आला आहे. हे अॅप ड्रायव्हर-फ्रेंडली (Driver-friendly Model) पद्धतीने कार्य करणार आहे. यामध्ये ड्रायव्हर कम्युनिटीला 80 टक्क्यांहून अधिक भाडे मिळणार असल्याने त्यांच्या उत्पन्नात स्थैर्य येण्याची अपेक्षा आहे.
कमी कमिशन, वेळेवर पेमेंट (Timely Payment) आणि तांत्रिक सहाय्य (Technical Support) यामुळे खासगी टॅक्सी कंपन्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी कमी होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. लॉन्चपूर्व टप्प्यातच दिल्लीमध्ये सुमारे 56 हजार ड्रायव्हर्सनी भारत टॅक्सी अॅपवर नोंदणी (Registration) केली आहे. यावरून ड्रायव्हर समुदायामध्ये या प्लॅटफॉर्मबाबत मोठा उत्साह दिसून येतो. त्यामुळे सेवा सुरू होताच प्रवाशांना पुरेशा प्रमाणात वाहने उपलब्ध होतील, अशी सरकारची अपेक्षा आहे.
भारत टॅक्सी अॅपवर ऑटो, कार आणि बाईक टॅक्सी (Auto, Car and Bike Taxi) अशा विविध पर्यायांची सुविधा मिळणार आहे. यामुळे लहान अंतरापासून ते लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एकाच प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार आहे. रिअल-टाइम ट्रॅकिंग (Real-time Tracking), 24×7 कस्टमर सपोर्ट (Customer Support), कॅश आणि डिजिटल पेमेंट (Cash and Digital Payment) तसेच सेफ्टी फीचर्स (Safety Features) यांचा समावेश करण्यात आला आहे.
फॅमिली ट्रॅव्हलर्स (Family Travellers), कॉर्पोरेट यूजर्स (Corporate Users) आणि टुरिस्ट्स (Tourists) यांवर या सेवेचा विशेष भर आहे. भारत टॅक्सी मोबाइल अॅप सध्या गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर ट्रायल आणि फीडबॅकसाठी उपलब्ध आहे. आयओएस वर्जन (iOS Version) लवकरच लॉन्च होणार असून सध्या दिल्ली आणि गुजरातमध्ये प्रायोगिक स्वरूपात सेवा सुरू आहे. अॅप डाउनलोड करताना ते सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड (Sahakar Taxi Cooperative Limited) कडूनच जारी केलेले आहे, याची खात्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. bharattaxiapp.com या संकेतस्थळावर जाऊन क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करूनही अॅप डाउनलोड करता येणार आहे.