Weather Update: पुढील 4 दिवस महाराष्ट्राच्या हवामानात मोठा उलटफेर! कोकण ते विदर्भात पुन्हा टेन्शन वाढणार? तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील चार दिवस पुन्हा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तावला आहे. यावेळी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात पुढील चार दिवसानंतर पाऊस होऊ शकतो.  

Weather Update: पुढील 4 दिवस महाराष्ट्राच्या हवामानात मोठा उलटफेर! कोकण ते विदर्भात पुन्हा टेन्शन वाढणार? तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला असून एल निनोचा प्रभाव राज्यातील मॉन्सूनवर बघायला मिळतो आहे. जूलैदरम्यान राज्यातील काही भागात चांगला पाऊस पडला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यातच भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील चार दिवस पुन्हा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तावला आहे. यावेळी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात पुढील चार दिवसानंतर पाऊस होऊ शकतो.  

यावेळी मुंबईसह पालघर, पनवेल आणि ठाण्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कमीच राहणार असून हवामान कोरडे, दमट, उष्ण आणि काही ठिकाणी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसतील.

हेही वाचा- Nepal Earthquake: नेपाळवर दुहेरी संकट! पुरानंतर 5.3 तीव्रतेचा भूकंप, नदीचा प्रवाहही अडला; नागरिकांमध्ये भीती

तसेच उत्तर महाराष्ट्रात धुळे आणि नंदुरबार वगळता पावसाची शक्यताही नाही. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवस हलक्या पावसासह वाऱ्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सध्या सर्वदूर पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढली असून, चांगला पाऊस कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये कोरडे, दमट आणि ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. काही भागात हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील एक ते दोन दिवस अशीच हवामानाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number