आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी गॅस सिलिंडर मिळणार फ्री; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

LPG Cylinder : नागरिकांसाठी सर्वात आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता सरकारच्या निर्णयामुळे 1 सिलिंडर नागरिकांना एकदम फ्री मिळणार आहे. मात्र, त्यासाठी नियम कोणते आहे, ते जाणून घ्या.

आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी गॅस सिलिंडर मिळणार फ्री; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
LPG Cylinder free

अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण आलेला असताना नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने सरकारकडून नागरिकांना एक एलपीजी सिलिंजर फ्री मिळणार आहे. यामुळे नागरिकांची यंदाची दिवळी अधिक गोड होणार आहे. मात्र, ही मदत नेमकी कोणाला मिळणार आणि त्यासाठी नियम काय आहेत, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

मोफत सिलिंडरसाठी काय आहेत नियम?
मिळालेल्या माहितीनूसार, ही योजना दिल्ली सरकारने लागू केली असून गेल्या काही महिन्यांपूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखआ गुप्ता यांनी या योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार, आता दिल्लीमधईल रेशन कार्ड असलेल्या कुटुंबानांच फक्त दरवर्षी 2 एलपीजी सिलिंडरच्या किंमती इतकी आर्थिक मदत केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही मदत होळी तसेच दिवाळी या दोन सणांच्या वेळी देण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्या महिन्यात एलपीजी सिलिंडर हे रिफिल केलेला आवश्यक असणार नाही. तर फ्री सिलिंडरसाठीचे पैसे हे कुटुंबातील ज्या व्यक्तीचा मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्याच खात्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांना बँक खाचे हे आधारशी लिंक करणे अत्यंत गरजेचे असणार आहे. त्यामुळेत थेट DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफि ट्रान्सफरच्या माध्यमातून ही रक्कम खात्यात जमा केली जाणार आहे.

या योजनेतील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जे रेशन कार्डधारक कुटुंब एलपीजी वापरत असतील किंवा स्वयंपाकासाठी PNG वापरत असतील, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच, फक्त एलपीजी कनेक्शन असलेल्या कुटुंबापुरती ही योजना मर्यादित राहणार नाही.

किती मिळणार आर्थिक मदत?
दिल्ली शहरात सध्या 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत ही 942 रुपये आहे. तर दुसरीकडे,19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात सध्या 62.59 रुपयांची वाढ ही करण्यात आलेली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने दिल्लीमधील रेशन कार्डधारक कुटुंबांना सरकारच्या या आर्थिक मदतीचा फायदा कधी आणि किती रकमेच्या स्वरुपात मिळेल, याकडे असंख्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number