LPG Gas Cylinder : सणासुदीच्या तोंडावर मोठा दिलासा! आता 6 सिलिंडर मोफत मिळणार; पण फक्त…

Free LPG Cylinder : महागाईने गेल्या अनेक दिवसांपासून त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेसाठी सणासुदीच्या तोंडावर एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. मात्र, हा लाभ सर्वांनाच मिळणार नाही तर त्यासाठी काही अटी ही ठेवण्यात आलेल्या आहेत.

LPG Gas Cylinder : सणासुदीच्या तोंडावर मोठा दिलासा! आता 6 सिलिंडर मोफत मिळणार; पण फक्त…
मोफत गॅस सिलिंडर योजनेत 6 सिलिंडर मोफत

महागाईने गेल्या अनेक दिवसांपासून त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेसाठी सणासुदीच्या तोंडावर एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. घरगुती गॅसच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसमान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट पू्र्णपणे कोलमडले असतानाच, सरकारने थेट मोफत सिलिंडर देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.

महागाईत मोठा दिलासा
मिळालेल्या माहितीनुसार,अंत्योदय अन्न योजना अतंर्गत येणाऱ्या गरीब कुटुंबाना आता वर्षाताला तब्बल 6 एलपीजी सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. या महत्त्वाकांक्षी योजनेला नुकतीच अधिकृत मंजुरी देण्यात आलेली असून, याची सविस्तर माहिती स्वत: राज्याचे नागरिक पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री सतीश शर्मा यांनी विधानसभेत दिलेली आहे, त्यामुळे आता लवकरच या योजनेची अंमलबजावणी सुरु होणार आहे. मात्र, हा लाभ सर्वांनाच मिळणार नाही तर त्यासाठी काही अटी ही ठेवण्यात आलेल्या आहेत. ही योजना फक्त अंत्योदय अन्न योजना अंतर्गत पात्र ठरणाऱ्या अत्यंत गरीब कुटुंबासाठी असणार आहे. सर्वसामान्य LPG ग्राहकांना याचा लाभ घेता येणार नाही.

हेही वाचा- Vande Bharat : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस रुळावर; मुंबईला जोडणार का? जाणून घ्या वेळापत्रक

कसा मिळणार लाभ? जाणून घ्या
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण योजना आहे जी, DBT या पद्धतीने राबवली जाणार आहे. म्हणजेच,लाभार्थ्यांना सुरुवातीला बाजारभावाने गॅस सिलिंडर विकत घ्यावा लागेल आणि त्यानंतर त्या सहा सिलिंडरच्या रिफिलची संपूर्ण रक्कम ही थेट लाभार्थ्यांच्या असलेल्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे कुठेही रांगेत उभं राहण्याची आता गरज नाही. महत्त्वाचे म्हणजे, यासाठी तुमचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे.

फक्त यांना घेता येणार लाभ
अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा निर्णय जम्मू-काश्मीर सरकारने दिलेला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या सुमारे 8.79 लाख इतके AAY लाभार्थी आहेत, ज्यांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे. यादरम्यान,देशात सर्वात महाग गॅस सिलिंडर लेहमध्ये मिळतो, जिथे त्याची किंमत ही 1,179 रुपये इतकी असून दिल्लीच्या तुलनेत हा दर 237 रुपयांनी जास्त आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number