मिठी नदीतील गाळ उपसा घोटाळा प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. सध्या या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याची आज कसून चौकशी केली आहे.
सकाळपासून चौकशीसाठी हजर राहिलेल्या डिनो मोरियाची तब्बल 6 तास 45 मिनिटे कसून चौकशी करण्यात आली. या तपासादरम्यान EWO च्या हाती लागलेल्या अत्यंत महत्त्वाच्या पुराव्यांच्या आधारे त्याला काही प्रश्न विचारण्यात आले आणि त्याचा जबाब नोंदवण्यात आला. या प्रकरणाशी संबंधिक असलेले काही कागदपत्रे हे सादर करण्याच्या सूचना या पोलिसांनी त्याला दिलेल्या आहेत.
महत्त्वाचे म्हणजे,सध्या त्याला अटक करण्यात आलेली नसून, फक्त चौकशी करत सोडून दिले आहे. यापूर्वीही या घोटाळ्यात त्याची चौकशी झाली होती. या पुढे गरज पडल्यास पुन्हा बोलावले जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.