शालेय बसच्या फीबाबत मोठी अपडेट! UPI ऐवजी चेक किंवा क्रेडिट कार्डचा पर्याय; काय आहे कारण?

School Bus Fee Payment Rules Change : शालेय बसच्या शुल्क भरण्याबाबत पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यूपीआय व्यवहारांवरील शुल्काचा मुद्दा उपस्थित करत शालेय बस मालक संघटनेने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे बस सेवा घेणाऱ्या पालकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
शालेय बसची फी आता UPI ने भरता येणार नाही
School Bus Fee Payment Rules Change

शालेय बसने प्रवास करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता यापुढे शालेय बसचे शुल्क हे युपीआयद्वारे भरता येणार नाही. शालेय बस मालक संघटना आणि शाळा व्यवस्थापनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे.

कधीपासून लागू होणार नवा नियम?
मिळालेल्या माहितीनुसार, बसचे शुल्क हे आता फक्त आणि फक्त धनादेश किंवा क्रेडिट कार्डद्वारेच स्वीकारले जाणार आहे. युपीआयचा पर्याय हा पालकांसमोर बंद करण्यात आलेला आहे. या निर्णयामागील कारणही तसंच धक्कादायक आहे. 2 हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या UPI व्यवहारांवर प्रति व्यवहार 200 रुपये इतके शुल्क आकारले जात असल्याचा दावा शाळांनी केलेला आहे. त्यामुळे सहा महिन्यांचे एकत्रित शु्ल्क UPI द्वारे स्वीकारणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचे एसबीओएचे म्हणणे आहे. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका हा एकरकमी तब्बल सहा महिन्यांची फी भरणाऱ्या पालकांना बसणार आहे.

हेही वाचा-केंद्राचा कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा! औषधांच्या किमती कमी होणार; किती टक्क्यांनी मिळणार कपात?

आता चेक किंवा क्रेडिट कार्डच
त्यांची रक्कम दोन हजारांपेक्षा जास्त असल्याने त्यांना आता धनादेश काढणे किंवा क्रेडिट कार्ड वापरणेच बंधनकारक असणार आहे. युपीआय सारख्या सहज होणाऱ्या सुविधेपासून त्यांना आता मुकावे लागणार आहे. या संदर्भात शाळांनी पालकांसाठी परिपत्रक काढले आहे.

नव्या सरकारी नियमानुसार हे शुल्क लागत असल्याचे त्यात म्हटले आहे. मात्र, या शुल्कातून शालेय बस मालकांना सूट मिळावी म्हणून केंद्रीय अर्थमंमत्री निर्मला सीतारामन यांना ई-मेलद्वारे मागणी करण्यात आल्याचेही शाळांनी स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version