निलेश घायवळचा ‘गायवळ’ झाला अन् थेट लंडन गाठलं; कोर्टाच्या निकालाने प्रकरणाला नवं वळण

Pune Crime Nilesh Ghaywal acquitted : घायवळचा गायवळ झाला अन् बनावट पासपोर्टवरून लंडनला पळाला. मोक्का कोर्टात प्रकरणाची सुनावणी झाली आणि आता निकाल समोर आला. निलेश घायवळला कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला की प्रकरणाला आणखी नवं वळण मिळालं?

निलेश घायवळचा ‘गायवळ’ झाला अन् थेट लंडन गाठलं; कोर्टाच्या निकालाने प्रकरणाला नवं वळण
कोर्टाच्या निकालाने नवं काय समोर आलं?

पुणे पोलिसांना गुंगारा देत परदेशात पळून गेलेल्या कुख्यात गुंड असलेल्या निशेल घायवळसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. कारागृहात असताना खंडणी मागितल्याच्या एका जुन्या प्रकरणात विशेष मोकोका न्यायालयाने त्याची आणि त्यासोबत त्याच्या साथीदारांची निर्दोष सुटका केलेली आहे.

प्रकरणात नेमकं काय घडलं?
2020 मध्ये घडलेल्या एका प्रकरणात निलेश घायवळवर गुन्हा नोंदवण्यात आलेला होता. तुरुंगात असताना त्याने त्याचा साथीदार संतोश धुमाळ मार्फत एका व्यावसायिकाकडे खंडी मागितल्याचा आरोप होता. भावाच्या रॅलीसाठी जीप द्या, याच कारणातून खंडणी उकळण्याची तक्रार दाखल झाली होती आणि त्यानंतर या प्रकरणात मोकोक लावला होता. या खटल्याच्या सुनावरणीदरम्यान उच्च न्यायालयाने पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. एवढेच नव्हे तर पोलिसांनी जबरदस्ती गुन्हा दाखल करुन घेतल्याचा संशय व्यक्त करत, कोर्टाने तक्रार दाराचा जबाब पुन्हा एकदा नोंदवण्याचे आदेश दिले. त्यानुसारच जेव्हा तक्रारदाराला न्यायालयात बोलावण्यात आले,तेव्हा त्याने धक्कादायक खुलासे केले.

हेही वाचा-मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; यादीतून वगळलेल्या तालुक्यांनाही आता मिळणार ‘ही’ मदत

आपल्याकडूनच दबाव टाकत तक्रार लिहून घेतल्याचे त्याने कोर्टात सांगितले, असा कोणताही खंडणीचा प्रकार घडलाच नाही, असे त्याने सांगितले. तक्रारदारच फिरल्याने सरकारी पक्षाचा खटला अतिशय कमकुवत झाला आणि त्याचा फायदा थेट आरोपींना झाला. या सर्व गोष्टीमुळे पुराव्याअभावी न्यायालयाने निलेश घायवळवरसह सर्व आरोपींनी निर्दोष मुक्त करण्यात आले.

घायवळचा ‘गायवळ’ झाला अन् लंडनला पळाला
दरम्यान, निलेश घायवळवर हा कोथरुड गोळीबारानंतर चर्चेत आलेला होता. या प्रकरणानंतर त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस ही काढली होती. मात्र,तोपर्यंत त्याने हुशारीने बनावट कागदपत्रांच्या आधारेच परदेशात पलायन केले. पासपोर्ट काढत असताना त्याने स्वत:च्या नावातही बदल केला होता. घायवळ ज्यागी त्याने गायवळ अशी स्पेलिंग करत त्याने यंत्रणेला चकवा दिला आणि लंडनला पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा भाऊ सचिन घायवळ याला राजस्थानच्या सीकर या जिल्ह्यातून अटक केली. सचिनवरही खून, खंडणीसारखे गंभीर असे गुन्हे दाखल आहेत. सध्या निलेश फरार असला तरी निकालामुळे त्याला मोठा दिलासा मिळालेला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number