राजधानी दिल्लीमधील राजकीय वातावरण मंगळवारी चांगलेच तापले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठीच INDIA आघाडीने आकाशवाणी भवण या ठिकाणी आंदोलन पुकारले होते.याच आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी कठोर कारवाई करत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह काही वरिष्ठ खासदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
बेकायदा आंदोलन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आलेली होती. पोलिसांनी काही वेळातच संपूर्ण आकाशवाणी भवन परिसर रिकामा केला. या दरम्यान, कारावईनंतर मोठा राजकीय गोंधल उडाला. ताब्यात घेतल्याच्या काही तासाभरातच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची पोलिसांनी सुटका केली. दोन्ही नेत्यांना पोलिसांनी सोडल्यानंतर कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, या कारवाईमुळे केंद्र सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष हा आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.