मुंबई : सध्या राज्यातील राजकारणात विधान परिषदेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. त्यातच भाजप विधान परिषदेसाठी उमेदवारांची यादी गुरुवार, 30 एप्रिल रोजी जाहीर करणार असल्याचे समजते. यंदा मुंबई वगळता राज्यातील 5 विभागांमधून उमेदवारांना संधी दिली जाणार असल्याचे दिसून येत आहे. तर भाजपच्या गोटात विधान परिषदेसाठी नेतेमंडळींची मोठी भाऊगर्दी झाल्याचे सांगितले जात आहे. अशातच सावध पवित्रा घेत ऐनवेळी भाजपकडून नावं जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून 30 जणांची यादी दिल्ली नेतृत्वावर पाठवण्यात आली होती. मात्र, ही यादी निम्मी करुन पाठवा, असा निरोप दिल्ली नेतृत्वाने दिला होता. तर भाजपकडून 14 नावं आता दिल्लीला पाठवण्यात आली आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही नावं निश्चितीसाठी दिल्लीला पाठवल्याचे समजते. यावेळी पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.