दक्षिण अमेरिकेतील बोलीवियामध्ये हवाई दलाचे एक लष्करी विमान 27 फेब्रुवारी रोजी एल आल्टो विमानतळाजवळ कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक वृत्तांनुसार हे विमान एल आल्टो (El Alto) शहरातील एका व्यस्त रस्त्यावर कोसळले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये महामार्गावर विमानाचे अवशेष विखुरलेले दिसत असून बचाव पथके घटनास्थळी धाव घेताना दिसत आहेत.
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, हा अपघात बोलिवियन एअर फोर्सच्या Lockheed C-130 Hercules या लष्करी वाहतूक विमानाचा आहे. सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास विमान कोसळल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, विमानाला विमानतळ परिसरात उतरताना किंवा उड्डाण घेताना तांत्रिक अडचणी आल्या असाव्यात, त्यानंतर ते नियंत्रणाबाहेर जाऊन खाली आले. या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी असल्याची माहिती आहे.
विमान रस्त्यावरून जाणाऱ्या काही वाहनांना धडकले असल्याचीही माहिती समोर आली आहे. घटनास्थळावरील छायाचित्रांमध्ये विमानाच्या फ्युसेलाजचा (fuselage) काही भाग रस्त्यावर पडलेला दिसत असून नागरिक मदतीसाठी आर्त हाक देताना दिसत आहेत.
अपघातानंतर अग्निशमन दल, पोलीस आणि बोलिवियन हवाई दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. प्राप्त अहवालानुसार, हे विमान देशाच्या विविध भागांत नवीन चलनी नोटा पोहोचवण्यासाठी जात होते. रस्त्यावर नोटा विखुरलेल्या अवस्थेत मिळाल्या आहेत.
Reuters reports, "Fifteen people were killed and at least 30 more were injured on Friday evening after a Bolivian Air Force Hercules aircraft carrying new banknotes from the country's central bank crashed onto a busy avenue amid inclement weather in the city of El Alto, near… pic.twitter.com/QqdXTy7wgL — ANI (@ANI) February 28, 2026
विमानात किती जण प्रवास करत होते आणि अपघाताचे नेमके कारण काय, याबाबतही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्राथमिक स्तरावर यांत्रिक बिघाड किंवा उच्च उंचीवरील धावपट्टीची (runway) परिस्थिती यांसारख्या कारणांवर तर्कवितर्क लावले जात आहेत.
?A Bolivian Air Force C-130H Hercules crashed Friday evening on a roadway near El Alto International Airport in La Paz. At least 15 killed and 30+ injured, according to sources. Investigation ongoing.  Sources: @sentdefender, Reuters pic.twitter.com/x9sggH3IdR — Mossad Commentary (@MOSSADil) February 28, 2026
एल आल्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ सुमारे 4061 मीटर (13325 फूट) समुद्रसपाटीपासून उंचीवर स्थित असून जगातील सर्वाधिक उंचीवरील व्यावसायिक आणि लष्करी विमानतळांपैकी एक मानला जातो. या दुर्घटनेबाबत बोलिवियन हवाई दल किंवा सरकारकडून अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा आहे.