BSNL Recharge Offer: फक्त एका रुपयात अनलिमिटेड कॉलिंग अन् डेली डेटा! बीएसएनएलची ‘फ्रीडम 2.0’ ऑफर जाहीर

ही विशेष ऑफर 12 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली असून 12 सप्टेंबर 2026 पर्यंत वैध असणार आहे.

BSNL Recharge Offer: फक्त एका रुपयात अनलिमिटेड कॉलिंग अन् डेली डेटा! बीएसएनएलची ‘फ्रीडम 2.0’ ऑफर जाहीर

BSNL Freedom 2.0 offer 1 rupee 2026: भारतीय दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (BSNL) 15 ऑगस्ट 2026 च्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आपल्या नवीन ग्राहकांसाठी 'फ्रीडम 2.0' (Freedom 2.0) नावाची धमाकेदार ऑफर लाँच केली आहे. या योजनेअंतर्गत नवीन ग्राहकांना केवळ 1 रुपयामध्ये सिम कार्ड (SIM Card) मिळणार असून, त्यावर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दैनंदिन इंटरनेट डेटा आणि फ्री एसएमएस (SMS) सुविधा दिली जाणार आहे. ही विशेष ऑफर 12 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली असून 12 सप्टेंबर 2026 पर्यंत वैध असणार आहे.

अवघ्या एका रुपयाच्या प्लॅनमध्ये काय-काय मिळणार?
बीएसएनएलच्या या सवलतीच्या योजनेत नवीन युजर्ससाठी अनेक उत्तम फायदे समाविष्ट करण्यात आले आहेत:
– अनलिमिटेड कॉलिंग: भारतातील कोणत्याही नेटवर्कवर मोफत अन् अमर्याद व्हॉईस कॉल्स (Unlimited Voice Calls).
– डेटा आणि मेसेज: दररोज 1GB हाय-स्पीड इंटरनेट डेटा आणि दरदिवशी 100 मोफत एसएमएस (SMS).
– वैधता काळ: हा प्लॅन तब्बल 24 दिवसांच्या वैधतेसह (Validity) येतो, ज्यामुळे ग्राहकांना नेटवर्क गुणवत्तेची खात्री करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

हेही वाचा – LPG Cylinder Update : LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी; 16 ऑगस्टपूर्वी 'हे' काम न केल्यास गॅस पुरवठा अन् सबसिडी होणार बंद

नवीन ग्राहकांसाठी सुवर्णसंधी; असा घ्या योजनेचा लाभ
ही ऑफर मुख्यत्वे नवीन सिम कार्ड खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देत आपला ग्राहकवर्ग वाढवण्यासाठी BSNL ने हे पाऊल उचलले आहे. ज्यांना नवीन कनेक्शन घ्यायचे आहे किंवा सेकेंडरी नंबर (Secondary Number) म्हणून बीएसएनएल वापरायचे आहे, ते नागरिक आपल्या जवळच्या BSNL ग्राहक सेवा केंद्रात (CSC) किंवा अधिकृत विक्रेत्याकडे जाऊन या 1 रुपयाच्या प्लॅनचा लाभ घेऊ शकतात.

सणासुदीच्या काळात BSNL ची लोकप्रिय रणनीती
बीएसएनएलने अशी एक रुपयाची ऑफर आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ऑक्टोबर 2025 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर आणि नंतर एप्रिल 2026 मध्येही ही योजना आणली गेली होती. ग्राहकांच्या उत्तम प्रतिसादामुळे स्वातंत्र्यदिनानिमित्त ही 'फ्रीडम 2.0' पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र, प्रत्येक टेलिकॉम सर्कलनुसार या प्लॅनचे नियम व फायदे थोडे बदलू शकतात, त्यामुळे सिम खरेदी करण्यापूर्वी स्थानिक BSNL केंद्रात शहानिशा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – Kangana Ranaut: 'तुम्हाला तर स्वातंत्र्य 2014 ला मिळालं ना?'; कंगना रनौत यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छांवरून भडकले नेटकरी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number