BSNL VoWiFi Service: डोंगरदऱ्यातही आता फोन वाजणार! कॉल,मेसेजसाठी नेटवर्कची गरज नाही, BSNL ची सेवा लवकरच

या सुविधेमुळे मोबाईल नेटवर्क नसतानाही वाय-फायच्या मदतीने थेट HD कॉल करता येणार असून ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.

BSNL VoWiFi Service: डोंगरदऱ्यातही आता फोन वाजणार!  कॉल,मेसेजसाठी नेटवर्कची गरज नाही, BSNL ची सेवा लवकरच

नवी दिल्ली: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या ग्राहकांना एक 'हाय-टेक' भेट दिली आहे. आता तुमच्या फोनमध्ये टॉवरचे नेटवर्क असो वा नसो, तुमचे बोलणे थांबणार नाही. 1 जानेवारी 2026 पासून BSNL ने संपूर्ण देशभरात 'व्हॉइस ओव्हर वाय-फाय' (VoWiFi) सेवा अधिकृतपणे सुरू केली आहे. वारंवार कॉल ड्रॉप होणाऱ्या किंवा तळघरात आणि दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी ही सेवा म्हणजे एक प्रकारचे 'डिजिटल वरदान' ठरणार आहे.

ही किमया घडते कशी? तर VoWiFi तंत्रज्ञान हे इंटरनेट प्रोटोकॉल मल्टीमीडिया सबसिस्टम (IMS) वर आधारित आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुमच्या फोनला मोबाईल नेटवर्क मिळत नसेल, पण तिथे एखादे वाय-फाय कनेक्शन उपलब्ध असेल, तर तुमचा फोन आपोआप त्या वाय-फायचा वापर करून कॉल जोडतो. यासाठी तुम्हाला कोणत्याही बाह्य ॲपची गरज नाही; तुमच्या फोनच्या साध्या डायलरवरूनच तुम्ही एचडी क्वालिटीमध्ये गप्पा मारू शकता.

हेही वाचा: Nagpur Politics: नागपुरात हायव्होल्टेज ड्रामा; समर्थकांनी बंडखोर नेत्यालाच घरातच डांबलं, नेमकं झालं काय?

विशेष म्हणजे, या सुविधेमुळे मोबाईल टॉवरवरील भार कमी होणार असून कॉलची स्पष्टता कमालीची वाढणार आहे. ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर जिथे अजूनही मोबाईलचे सिग्नल पोहोचताना दमछाक होते, तिथे ब्रॉडबँडच्या मदतीने आता विनाअडथळा संवाद साधता येईल. दूरसंचार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ही सेवा देशातील सर्व टेलिकॉम सर्कल्समध्ये उपलब्ध असून यासाठी ग्राहकांना एकही रुपया अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार नाही.

तुमच्या फोनवर ही सेवा सुरू करणे अत्यंत सोपे आहे. यासाठी फक्त तुमच्या स्मार्टफोनच्या 'Settings' मध्ये जा, तिथे 'Network & Internet' किंवा 'Connection' पर्यायावर क्लिक करा आणि 'Wi-Fi Calling' चा बटण 'On' करा. एकदा का ही सेटिंग चालू झाली की, नेटवर्क नसतानाही तुमचा फोन वाय-फायच्या साथीने जगाशी जोडलेला राहील. विशेषतः लिफ्टमध्ये किंवा मोठ्या इमारतींच्या आत जिथे सिग्नल 'डेड' होतात, तिथे ही सुविधा अत्यंत प्रभावी ठरेल.

BSNL सध्या एका बाजूला 4G चे जाळे विस्तारत आहे आणि 5G च्या उंबरठ्यावर उभी आहे; अशा वेळी VoWiFi चा हा निर्णय खाजगी कंपन्यांना कडवी झुंज देणारा ठरू शकतो. 'कनेक्टिंग इंडिया' या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत, दुर्गम भागात डिजिटल क्रांती पोहोचवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आता नेटवर्कसाठी खिडकीत किंवा घराबाहेर धावण्याचे दिवस संपले असून, वाय-फायच्या वेगावर तुमची नाती अधिक घट्ट होणार आहेत.

हेही वाचा: Ramdas Athawale vs Raj Thackeray : राज ठाकरेंची भाषणं भारी, पण पाटी कोरी…; रामदास आठवलेंची राज ठाकरेंवर कविता

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number