Road Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; डंपरच्या धडकेत कारचा चक्काचूर, पती-पत्नीसह 2 चिमुकल्यांचा जागीच मृत्यू

या दुर्दैवी घटनेत कारमधील पती-पत्नीसह त्यांच्या 2 चिमुकल्या मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर एक 7 वर्षांची मुलगी सुदैवाने बचावली असून ती गंभीर जखमी झाली आहे.<br/>

Road Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; डंपरच्या धडकेत कारचा चक्काचूर, पती-पत्नीसह 2 चिमुकल्यांचा जागीच मृत्यू

Road Accident: उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात सुरक्षिततेचे नियम डावलल्यामुळे आणि वेगाच्या अनिर्बंध आव्हानामुळे एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. रामनगर-बाराबंकी महामार्गावरील भुलभुलैया गावाजवळ असलेल्या एका हॉटेलसमोर मंगळवारी हा भीषण अपघात झाला. लखनऊच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या एका कारला समोरून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की, कार डंपरच्या पुढच्या भागात अडकली आणि तब्बल 50 मीटर अंतरापर्यंत महामार्गावर घासत गेली. या दुर्दैवी घटनेत कारमधील पती-पत्नीसह त्यांच्या 2 चिमुकल्या मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर एक 7 वर्षांची मुलगी सुदैवाने बचावली असून ती गंभीर जखमी झाली आहे.

आजारी नातेवाईकाला भेटायला जाताना काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, श्रावस्ती जिल्ह्यातील भिनगा परिसरातील रहिवासी मोहम्मद शरीफ हे आपल्या आजारी बहिणीची विचारपूस करण्यासाठी कुटुंबासह लखनऊकडे निघाले होते. त्यांच्यासोबत पत्नी तबस्सुम बानो, मुलगा उजैम, मुलगी रुश्दा आणि लहान मुलगी हुदा असे सगळे एकत्र प्रवास करत होते. मात्र, भुलभुलैया गावाजवळील वळणावर अचानक आलेल्या डंपरने त्यांच्या वाहनाला चिरडले. अपघाताचा भीषण आवाज ऐकून स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही तातडीने धाव घेतली. स्थानिकांच्या साहाय्याने कारचे दरवाजे आणि काचा तोडून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

हेही वाचा – High Court On Hijab: 'शिस्त व समानता महत्त्वाची..' उच्च न्यायालयाने फेटाळली शाळेत हिजाबची परवानगी मागणारी याचिका

रुग्णालयात चौघांना मृत घोषित; 7 वर्षांची मुलगी गंभीर
अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे बडागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोहम्मद शरीफ, त्यांची पत्नी तबस्सुम बानो आणि दोन मुलांना तपासून मृत घोषित केले. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या 7 वर्षांच्या हुदा हिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. श्रावस्ती येथील नातेवाईकांना या अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण गावावर आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी डंपर चालक आणि वाहनाबाबत कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. 
 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number