मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! आसनगांव-कसारा लोकल आजपासून बंद; जाणून घ्या पर्यायी व्यवस्था

Mumbai Local Train Block : मध्य रेल्वेच्या आसनगाव-कसारा मार्गावर आजपासून मोठा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तिसऱ्या मार्गिकेच्या कामामुळे लोकल आणि काही एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम होणार आहे. वेळापत्रकात नेमके काय बदल होणार? पर्यायी प्रवासाची सोय कोणती? जाणून घ्या.
आजपासून आसनगाव ते कसारा लोकल बंद
Asangaon-Kasara Local Trains Cancelled

मुंबई : मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आसनगांव ते कसारा दरम्यान तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू असल्याने आजपासून मोठा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. चला तर, लोकलच्या वेळापत्रकात नेमका काय बदल झाला आहे आणि कधीपासून ते किती तारखेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात घेणार आहे. ते सविस्तर पाहूया.

कसं असेल वेळापत्रक?
मिळालेल्या माहितीनुसार, या मेगा ब्लॉकमुळे आसनगांव ते कसारा दरम्यान धावणाऱ्या सर्व लोकल आणि काही एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी वरून सुटणाऱ्या गाड्या आता फक्त आसनगांवपर्यंतच धावणार आहेत. त्यामुळे दररोज कसारा, इगतपुरीकडे जाणाऱ्या आणि तिथून मुंबईकडे येणाऱ्या हजारो प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत.

हेही वाचा-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो पाठोपाठ आता पुन्हा एक मोठा निर्णय; लाखो कर्मचाऱ्यांचा प्रवास होणार सुसाट

कधीपासून ते किती तारेखपर्यंत?
आसनगांव ते कसारा दरम्यान तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू असल्याने मध्य रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून म्हणजेच 7 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर या 12 दिवसांसाठी मोठा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अनेक लोकल गाड्या रद्द आणि काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहेत.

प्रवाशांसाठी पर्यायी सोय कोणती?
ऑफिस, कॉलेज आणि नोकरदार प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी शहापूर एसटी आगारातून कसारा ते इगतपुरी आणि कसारा ते आसनगाव दरम्यान जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version