दसरा-दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये रेल्वे प्रवासाचं नियोजन करताय? मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, विशेष गाड्यांच्या मुदतवाढीची घोषणा

Central Railway : प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने महत्त्वाची अपडेट दिली आहे. विविध मार्गांवर धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांच्या सेवेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असून, कोणत्या मार्गावरील गाड्या किती दिवस धावणार, याकडे लक्ष लागले आहे.

दसरा-दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये रेल्वे प्रवासाचं नियोजन करताय? मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, विशेष गाड्यांच्या मुदतवाढीची घोषणा
Central Railway

दसरा आणि दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान एकेरी विशेष एक्स्प्रेस चालवण्यात येणार आहेत. ही गाडी नेमक्या कोणत्या वेळेला सुटणार, तिचे वेळापत्रक काय असेल आणि प्रवाशांसाठी कोणत्या सुविधा असणार आहे, याची सविस्तर माहिती जाणून घ्या.

जाणून घ्या वेळापत्रक
मिळालेल्या माहितीनुसार, ही विशेष गाडी रविवारी,25 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 12 वाजून 25 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकावरुन सुटले आणि त्याच दिवशी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी नागपूरला पोहोचेल. यामुळे नाशिकमार्गे विदर्भातकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा – मुंबई ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवास होणार सुसाट! वरळी ते शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूपर्यंत सिग्नलमुक्त प्रवास

असे असतील थांबे
महत्त्वाचे म्हणजे, या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिकरोड, मनमाड,जळगाव, भुसावळसह विदर्भातील बऱ्याच महत्त्वाच्या स्थानकांवक थांबा असणार आहे. या दरम्यान, मध्य रेल्वेने आधीच जाहीर केलेल्या अन्य विशेष गाड्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढही देण्यात आलेली आहे.

सीएसएमटी-लातूर, नागपूर-हडपसर, सीएसएमटी-कोल्हापूर या एक्स्प्रेस गाड्या 26 नोव्हेंबरपर्यंत धावणार आहेत. दुसरीकडे पुणे-अमरावतीला 24 नोव्हेंबर तर अमरावती-पुणे गाडीला 25 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. कोल्हापूर-कलबुर्गी गाडी ही 30 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number