Char Dham Yatra Suspended: केदारनाथ-बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळण्याचा धोका; चार धाम यात्रा 2 दिवसांसाठी बंद, पुढील 15 तास अतिवृष्टीचा इशारा

भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता मंगळवार आणि बुधवार या 2 दिवसांच्या कालावधीत ही यात्रा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.<br/><br/>

Char Dham Yatra Suspended: केदारनाथ-बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळण्याचा धोका; चार धाम यात्रा 2 दिवसांसाठी बंद, पुढील 15 तास अतिवृष्टीचा इशारा

Char Dham Yatra suspended:  उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि विविध ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे प्रशासनाने चार धाम यात्रा 2 दिवसांसाठी स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता मंगळवार आणि बुधवार या 2 दिवसांच्या कालावधीत ही यात्रा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

हवामानाचा अंदाज अन् प्रशासनाचे निवेदन
गढवाल विभागीय आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रमुख मार्गांवर दरडी कोसळल्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. तसेच पुढील 15 तासांत गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ परिसरात विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे हवामानात अनुकूल सुधारणा होईपर्यंत यात्रा स्थगित राहील. प्रशासनाने प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

यात्रेचा मार्ग आणि कालावधी
सामान्यतः हरिद्वार किंवा ऋषिकेश येथून सुरू होणाऱ्या या पवित्र यात्रेत भाविक यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या 4 धामांचे दर्शन घेतात. दरवर्षी साधारणपणे मे किंवा जून महिन्यात सुरू होणारी ही यात्रा नोव्हेंबर महिन्यात हिवाळ्यातील बर्फवृष्टीमुळे बंद केली जाते.

हेही वाचा – Guru Purnima 2026 : गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा! जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

चार धाम यात्रेचे धार्मिक महत्त्व
सनातन परंपरेमध्ये चार धाम यात्रेला अत्यंत पवित्र स्थान आहे. हिमालयाच्या कुशीत असलेल्या या दिव्य स्थळांचा प्रवास केल्याने आत्म्याला 'मोक्ष' मिळतो आणि सर्व पापांतून मुक्ती होते, अशी श्रद्धा आहे. निसर्गरम्य आणि आध्यात्मिक वातावरणामुळे दरवर्षी 10 लाखांहून अधिक भाविक या ठिकाणी हजेरी लावतात. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number