Manoj Jarange : कोणाला सुगावा न लागू देता जरांगेंच्या उपोषणाचा मंडप हटवला,अंतरवालीत नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी उभारण्यात आलेला मुख्य मंडप तसेच स्टेज अचानक हटवण्यात आलेला आहे.
Manoj Jarange : कोणाला सुगावा न लागू देता जरांगेंच्या उपोषणाचा मंडप हटवला,अंतरवालीत नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी उभारण्यात आलेला मुख्य मंडप तसेच स्टेज अचानक हटवण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे, कोणालाही याची भनक लागू न देता रातोरात ही संपूर्ण कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंतरवाली सराटीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी उभारण्यात आलेला मुख्य मंडप आणि स्टेज अचानक हटवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कोणालाही याची भनक लागू न देता रातोरात ही संपूर्ण कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

अंतरवालीतील मंडप गायब
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी एकत्रिक निर्णय घेत हा सर्व मंडप काढून टाकला आहे. मागील अनेक महिन्यांपासून याच मंडपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे,त्यासाठी उपोषण तसेच सभा घेतल्या होत्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव याच ठिकाणी जमा होत होते. सर्वजण या मंडपाला आंदोलनाचे प्रतीक ही मानत होते.

हेही वाचा-CM Devendra Fadanvis : शेतकऱ्यांना दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अखेर राज्यतील इतक्या तालुक्यात दुष्काळ जाहीर

खरं तर गेल्या काही दिवसांपासून गावामध्ये या बांधलेल्या मंडपावरुन मोठी कुजबूज सुरु होती. मनोज जरांगे यांनी शेवटच्या उपोषणावेळी हे उपोषण जाहीर केले होते. सरकारने काही मागण्या मान्य केल्याचा दावा देखील केला होता. याच

मनोज जरांगे यांनी शेवटच्या उपोषणावेळी हे उपोषण निर्णायक आणि अंतिम असल्याचे जाहीर केले होते. सरकारने काही मागण्या मान्य केल्याचा दावा देखील करण्यात आला होता. ग्रामपंचायतीच्या ठरावानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आता जरांगे पाटील यांची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंडप हटवल्याने अंतरवाली सराटीतील आंदोलनाचा एक अध्याय संपला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version