मुंबई, ८ मे २०२३, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगरातील नूर कॉलनी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने एका महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आरोपी पीडित महिलेला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केले. एवढेच नव्हेतर अत्याचार करताना व्हिडिओ काढून आरोपीने महिलेला ब्लॅकमेलही केले. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुक्तार खान उर्फ बब्बू (वय, ४२) असे आरोपीचे नाव आहे. मुक्तार हा नूर कॉलनी टाऊन हॉल येथील रहिवाशी असून राष्ट्रवादी काँगेस पक्षाचा शहर उपाध्यक्ष पदाचा कार्यभार संभाळतो. त्याच्याविरोधात याच परिसरात राहणाऱ्या एका महिलेने पोलिसांत बलात्काराची फिर्याद दिली. पीडिताने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी गेल्या काही दिवसांपासून तिचा पाठलाग करत होता.
एवढेच नव्हेतर आरोपीने अत्याचाराचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. ज्यामुळे पीडित महिला घाबरली. मात्र, तिने घरी परतल्यानंतर तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी त्वरीत पीडित महिलेला सोबत घेऊन सीटी पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.