CJP Protest : आंदोलन विद्यार्थ्यांवर पुन्हा पोलिसांचा लाठीचार्ज; गर्दी वाढल्याने जंतरमंतरवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात

नवी दिल्ली : जंतर-मंतरजवळ ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) शी संबंधित आंदोलक आणि सुरक्षा दले यांच्यात बुधवारी संध्याकाळी पुन्हा एकदा संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेत दोन सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP), दोन निरीक्षक आणि एका पोलीस कर्मचाऱ्यासह दिल्ली पोलिसांचे अनेक अधिकारी व कर्मचारी जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) आणि पोलिसांना मर्यादित बळाचा वापर […]

CJP Protest : आंदोलन विद्यार्थ्यांवर पुन्हा पोलिसांचा लाठीचार्ज; गर्दी वाढल्याने जंतरमंतरवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात

नवी दिल्ली : जंतर-मंतरजवळ ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) शी संबंधित आंदोलक आणि सुरक्षा दले यांच्यात बुधवारी संध्याकाळी पुन्हा एकदा संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेत दोन सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP), दोन निरीक्षक आणि एका पोलीस कर्मचाऱ्यासह दिल्ली पोलिसांचे अनेक अधिकारी व कर्मचारी जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) आणि पोलिसांना मर्यादित बळाचा वापर करावा लागला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. दिल्ली पोलिसांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, कनॉट प्लेस परिसरातील टॉल्स्टॉय मार्गाजवळ रात्री साडेआठच्या सुमारास ही हिंसाचारची घटना घडली. तेथे “काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगड आणि बाटल्या फेकल्या”, ज्यामध्ये कनॉट प्लेसचे एसीपी विवेक भगत जखमी झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी राम मनोहर लोहिया (RML) रुग्णालयात हलवले. “काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आता शांतता प्रस्थापित झाली आहे,” असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : Anupam Kher on CJP Protest: CJP आंदोलनावर अनुपम खेर यांची भूमिका; विद्यार्थ्यांना पाठिंबा देतानाच राजकीय हस्तक्षेपाबाबत व्यक्त केली चिंता

जंतरमंतरवर घोषणांचा आवाज पुन्हा एकदा तीव्र झाला. आंदोलनकर्त्यांची गर्दी वाढली. देशभरातून आंदोलकांचे नवीन गट तिथे दाखल होत होते. ज्यातील अनेकांनी बस आणि ट्रेनने रात्रभर प्रवास करून हा प्रवास पूर्ण केला होता. ‘चलो संसद’ मोर्चाच्या दोन दिवसांनंतरही हे धरणे आंदोलन सुरूच होते. त्यात नवीन सहभागींची भर पडत होती. अनेकजण रात्रभर प्रवास करून पाठीवर बॅकपॅक आणि गुंडाळलेले फलक घेऊन आंदोलनस्थळी दाखल होत होते. जसजसे आंदोलकांच्या गटांचे आगमन होत होते. तसतसे स्वयंसेवक त्यांना बसण्याच्या जागांकडे निर्देशित करत होते. त्यांना पिण्याचे पाणी व अन्नाची पाकिटे वाटत होते. बुधवारी, 22 जुलै रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ‘नीट’ (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा मुद्दा आणि जंतरमंतर व आसपासच्या परिसरातील आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई, या विषयांनी जोरदार खळबळ उडवून दिली. सरकारने या विषयावर सविस्तर चर्चा करण्याची तयारी दर्शवली, मात्र कामकाजात अडथळा आणून विरोधी पक्षाने चर्चेला वाव दिला नाही, असा आरोपही केला. परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधातील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि तरुणांवर कोणतीही दंडात्मक किंवा सूडबुद्धीची कारवाई केली जाणार नाही, अशी स्पष्ट हमी केंद्र सरकारने दिल्यास आपण आपले बेमुदत उपोषण मागे घेऊ, असे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number