CNAP Service: अनोळखी कॉलचे टेन्शन जाणार, सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिले हे निर्देश

आता अनोळखी कॉलचे टेन्शन जाणार आहे. अज्ञाताचं नाव तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. त्यामुळे, तुमच्या मोबाईलवर कॉल आल्यानंतर आता नंबरसमवेत संबंधित व्यक्तीचं नावही दिसणार आहे.

CNAP Service: अनोळखी कॉलचे टेन्शन जाणार, सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिले हे निर्देश

मुंबई: मोबाईलवर येणारे अनोळखी कॉल अनेकांना त्रास देणारे वाटतात. त्यामुळे, अज्ञात किंवा अनोळखी नंबरपासून सुटका करण्यासाठी मोबाईलधारक फोन न उचलणे, संबंधित नंबर ब्लॉक करणे असे पर्याय निवडतात. अनेकदा अनोळखी नंबर नेमका कोणाचा आहे, त्याचं काम काय असेल, असे अनेक प्रश्न पडतात. परंतु, आता अनोळखी कॉलचे टेन्शन जाणार आहे. अज्ञाताचं नाव तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. त्यामुळे, तुमच्या मोबाईलवर कॉल आल्यानंतर आता नंबरसमवेत संबंधित व्यक्तीचं नावही दिसणार आहे. कारण, देशात CNAP सेवा सुरू करण्याचे निर्देश दूरसंचार विभागाने टेलिकॉम (Telecom) इंडस्ट्रीजला दिले आहेत. 

तुमच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीचा फोन आल्यास त्या व्यक्तीच्या नंबरसह त्या व्यक्तीचं नावही लवकरच दिसणार आहे. कारण, भारतात मोबाईलवर कॉलिंग नेम प्रेझेन्टेशन सर्व्हिस म्हणजे सीएनएपी सेवा सुरु करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. त्यामुळे यापुढे मोबाईलवर संपर्क करणाऱ्या व्यक्तीच्या क्रमांकासह, त्या व्यक्तीचं खरं नावही तुम्हाला दिसणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथरिटी ऑफ इंडिया म्हणजे ट्रायच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं सीएनएपी सेवा सुरु करण्याचे निर्देश मोबाईल कंपन्यांना दिले आहेत. येत्या 7 दिवसांत किमान एका सर्कलमध्ये तरी ही सीएनएपी सेवा सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे, मोबाईलवर येणारे स्पॅम कॉल्स आणि मोबाईलवर संपर्क साधून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांना आळा बसेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: Cyclone Montha Alert : आंध्र किनाऱ्यावर 'मोंथा'चा वेग मंदावला; मात्र धोका कायम; प्रशासन अलर्ट

TRAI म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथरिटी ऑफ इंडियाने फेब्रुवारी 2024 मध्येच या सेवासंदर्भाने आपल्या शिफारसी जारी केल्या होत्या. त्यानुसार, कॉलिंग नंबरसह संबंधित व्यक्तीचं नावही मोबाईलच्या स्क्रीनवर युजर्संना पाहता येईल. ज्या व्यक्तीच्या नावे सीम कार्ड असेल त्या व्यक्तीच्या नाव मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नाव Customer Application Form (CAF) मध्ये नमूद केलेल्या नावानेच निश्चित होईल. सीम खरेदी करताना ग्राहकाने दिलेले नावच या नंबरसमवेत दिसून येईल. 

TRAI च्या शिफारसीनुसार, CNAP ला भारतीय टेलिकॉम नेटवर्कमध्ये 'सप्लीमेंटरी सर्विस' च्या रुपाने सहभागी केले जाईल.  त्यामुळे, कॉलरची ओळख मोबाईल क्रमांक आणि नाव दोन्ही असेल. देशातील सर्वच टेलिकॉम कंपन्या जसं की Jio, Airtel, Vi आणि BSNL कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करुन देणे बंधनकारक असणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number