अपघाताची वाट पाहणारा प्रवास! काही वाहनाच्या टपावर तर काही…; थरकाप उडवणारा VIDEO

Amravati Shocking Video : अमरावतीतील दर्यापूर-आसेगाव मार्गावर खासगी वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आणि साहित्याची धोकादायक वाहतूक होत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकारावर प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.
खचाखच भरलेल्या वाहनाचा VIDEO समोर
dangerous journey in private vehicles

अमरावती : अमरावती जिल्ह्यात प्रवासी वाहतुकीचा धोकादायक प्रकार नुकताच समोर आलेला असून प्रशासनाच्या डोळ्यादेखत नियमांचे उल्लंघन सुरु असल्याचे चित्र आहे. दर्यापूर-आसेगाव या मार्गावर एका खासगी वाहनाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे.

या व्हिडिओत मध्य प्रदेशातून शेतीकामासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या आदिवासी मजुरांना जनावरांसारखे कोंबून नेले जात आहे, असे दिसत आहे. वाहनात क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवास बसवण्यात आलेले आहे. वाहनाच्या वरच्या टपावरही लोक आणि त्यांचे साहित्य भरलेले आहे.

हेही वाचा-लाईट जाताच घात झाला! 500 मीटरपर्यंत ओढत नेलं; बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा बळी

या खचाखच भरलेल्या वाहनामुळे कधीही मोठा अपघात होण्याची भीती आहे. अशा बेकायदेशीर आणि जीवघेण्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासन नेमकी कोणती कठोर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version