वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसामातील दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघातील अंतिम सामना रविवारी 5 फेब्रुवारीला वडोदराच्या कोटाम्बीमध्ये बीसीए स्टेडियमवर रंगला. यावेळी स्मृती मानधनाच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने वूमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यावेळी सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक आरसीबीने जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे प्रथम फलंदाजी करण्याचा मान दिल्ली कॅपिटल्सला मिळाला. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीसमोर 203 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पुर्ण करत आरसीबीने 19.4 ओव्हरमध्ये 204 धावा करत दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेटनं पराभव केला.
हेही वाचा- WPL Final 2026 : रणरागिणींची विजयी गर्जना! दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत RCB ने दुसऱ्यांदा उंचावला WPL चषक
स्मृती मंधानाची ऐतिहासिक कामगिरी
स्मृती मंधानाने 3 सिक्स आणि 12 चौकार लगावत 41 बॉलमध्ये 87 धावांची तुफानी खेळी केली, यात जॉर्जिया व्हॉलने 79 धावांची भागीदारी केली. यावेळी स्मृतीने 9 सामन्यांतील 9 डावांत 53.86 च्या सरासरीने आणि 153.25 च्या स्ट्राईक रेटने एकूण 377 धावा केल्या. स्मृतीने या दरम्यान एकूण 57 चौकार आणि 9 षटकार लगावले. तर हरमनप्रीतने 8 सामन्यांत 342 धावा केल्या. वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील या दमदार खेळीमुळे स्मृती मंधनाने ऑरेंज कॅप पटकावली आहे. यावेळी स्मृती मंधाना हरमनप्रीत कौरला मागे टाकत चौथ्या मोसमात सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली.
हेही वाचा- U19 World Cup 2026 : अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने किती वेळा गाजवलंय वर्चस्व? फायनलपूर्वी जाणून घ्या भारताच्या विजयाचा सुवर्ण इतिहास
यासामन्यावेळी कर्णधार स्मृती मानधना आणि जॉर्जिया व्हॉल दोघी संघाच्या ढाल बनल्या. स्मृती मानधनाने 87 धावांची तुफानी खेळी केली, यात जॉर्जिया व्हॉलने 79 धावांची भागीदारी केली. ज्यामुळे वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसामात आरसीबी दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ठरली आहे. वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसामातील अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु तिसऱ्यांदा आमनेसामने आले होते. यापुर्वी झालेल्या 2 सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. या विजयासह आरसीबीच्या ताफ्यात ही तिसरी ट्रॉफी जमा झाली आहे.