नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नेहरुंनंतर ही कामगिरी करणारे ते देशातले एकमेव नेते आहेत. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कार्यकाळाची सुरुवात ४६ जणांच्या मंत्रिमंडळाने झाली तर दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात ५८ जणांच्या मंत्रिमंडळाने झाली. मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात ७२ जणांच्या मंत्रिमंडळाने झाली. यामुळे हे मोदींचे आतापर्यंतचे सर्वात मोठे मंत्रिमंडळ ठरले आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
- मोदींव्यतिरिक्त ३० कॅबिनेट मंत्री
- एकूण ३१ कॅबिनेट मंत्री
- मंत्रिमंडळात पाच स्वतंत्र कार्यभार हाताळणारे राज्यमंत्री
- मोदींच्या मंत्रिमंडळात ३६ राज्यमंत्री
मोदींच्या मंत्रिमंडळातील नारीशक्ती
मोदींच्या मंत्रिमंडळात सात महिला मंत्री आहेत. निर्मला सीतरमण आणि अन्नपूर्णा देवी या दोघींनी केंद्रीय मंत्रिपदाची तर अनुप्रिया पटेल, शोभा करांदलाजे, रक्षा खडसे, सावित्री ठाकूर, निमूबेन बम्भानिया या पाच महिलांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
महाराष्ट्रातील सहा मंत्री
मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून निवडून आलेल्या सहा खासदारांचा मंत्री म्हणून समावेश झाला आहे. नितीन गडकरी आणि पीयूष गोयल या दोन भाजपा नेत्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेच्या प्रतापराव गणपतराव जाधव यांनी स्वतंत्र कार्यभार हाताळणारे राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर रामदास आठवले (रिपाईं - आठवले गट), रक्षा खडसे (भाजपा) आणि मुरलीधर मोहोळ (भाजपा) या तीन जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
- केंद्रीय मंत्रिमंडळात मोदींसह भाजपाचे ६१ मंत्री
- जनता दल संयुक्तचे एक मंत्री
- तेलुगु देसमचे दोन मंत्री
- शिवसेनेचा एक स्वतंत्र कार्यभार असलेला राज्यमंत्री
- जनता दल पुरोगामीचे दोन मंत्री
- इतर पाच मंत्री
- एकूण ७२ मंत्री
- केंद्रीय मंत्रिमंडळावर भाजपाचे वर्चस्व
- केंद्रीय मंत्रिमंडळात ३ जागा रिक्त
कॅबिनेट मंत्री (केंद्रीय मंत्री)
1. नरेंद्र मोदी (पंतप्रधान)
2. राजनाथ सिंह
3. अमित शाह
4. नितीन गडकरी
5. जेपी नड्डा
6. शिवराज सिंह
7. निर्मला सीतरमण
8. एस. जयशंकर
9. मनोहर लाल खट्टर
10. एचडी कुमारस्वामी
11. पीयूष गोयल
12. धर्मेंद्र प्रधान
13. जीतनाराम मांझी
14. राजीव रंजन उर्फ लल्लन सिंह
15. सर्वानंद सोनोवाल
16. डॉ. वीरेंद्र कुमार
17. राम मोहन नायडू TDP
18. प्रल्हाद जोशी
19. जुएल ओरांव
20. गिरीराज सिंह
21. अश्विनी वैष्णव
22. ज्योतिरादित्य सिंधिया
23. भूपेंद्र यादव
24. गजेंद्र सिंह शेखावत
25. अन्नपूर्णा देवी
26. किरण रिजिजू
27. हरदीप पुरी
28. मनसुख मांडविया
29. जी किशन रेड्डी
30. चिराग पासवान
31. सीआर पाटील (गुजरात भाजपाचे नेते)
राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
32. राव इंद्रजीत सिंह
33. जितेंद्र सिंह
34. अर्जुन राम मेघवाल
35. प्रतापराव गणपतराव जाधव
36. जयंत चौधरी
राज्यमंत्री
37. जितिन प्रसाद
38. श्रीपाद यशो नाइक
39. पंकज चौधरी
40. कृष्णपाल गुर्जर
41. रामदास अठावले
42. रामनाथ ठाकुर
43. नित्यानंद राय
44. अनुप्रिया पटेल
45. व्ही. सोमन्ना
46. चंद्रशेखर पेम्मासानी
47. एसपी सिंह बघेल
48. शोभा करांदलाजे
49. कीर्तिवर्धन सिंह
50. बीएल वर्मा
51. शांतनु ठाकुर
52. सुरेश गोपी
53. एल मुरगन
54. अजय टमटा
55. बंदी संजय
56. कमलेश पासवान
57. भागीरथ चौधरी
58. सतीश दुबे
59. संजय सेठ
60. रवनीत सिंह बिट्टू
61. दुर्गादास उईके
62. रक्षा खडसे
63. सुकांता मजुमदार
64. सावित्री ठाकूर
65. तोखन साहू
66. राजभूषण चौधरी
67. श्रीपति वर्मा/ श्रीनिवास वर्मा नरसापुरम
68. हर्ष मल्होत्रा
69. निमूबेन बम्भानिया
70. मुरलीधर मोहोल
71. जॉर्ज कुरियन
72. पबित्रा मार्गेरिटा