Mumbai News : डॉक्टरांचा हलगर्जीपणा! प्रसूतीनंतर महिलेच्या पोटातच विसरले हँड ग्लोजसह बँडेजही; रुग्णालय प्रशासनाविरोधात तक्रार दाखल

बईतील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या पोटातून हँड ग्लोज काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Mumbai News : डॉक्टरांचा हलगर्जीपणा! प्रसूतीनंतर महिलेच्या पोटातच विसरले हँड ग्लोजसह बँडेजही; रुग्णालय प्रशासनाविरोधात तक्रार दाखल

मुंबई : मुंबईतील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या पोटातून चक्क हँड ग्लोज काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नूर हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून झालेल्या या अक्षम्य चुकीमुळे महिलेचा जीव थोडक्यात बचावला. नुकतेच 10 मे रोज या महिलेची प्रसूती नूर हॉस्पिटलमध्ये करण्यात आली होती. त्यावेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या पोटीत हँड ग्लोज आणि बँडेज विसरले. पुढे डिस्चार्जनंतर या महिलेच्या पोटात दुखू लागले, तिला ताप येऊ लागला. तेव्हा सीटी स्कॅन केले असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला. महिलेला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिच्या पतीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली असता, पोलिसांनी प्रथम ऑपरेशन करून घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करा असे सांगितल्याचे पीडितेच्या पतीने नमूद केले. सध्या महिलेच्या पोटातून हँड ग्लोज काढण्यात डॉक्टरांना यश आले असून महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, पोलीस लवकरच महिलेचा जबाब नोंदवणार असून संबंधित डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

हेही वाचा : GT vs RR IPL 2026 : …तर कदाचित हा सामना फिरला असता! एक चूक महागात पडली अन् राजस्थाने फायनलमधील स्थान गमावले

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number